Indian Railway : पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी खुशखबर!! ‘या’ ट्रेनला मिळाले 4 अतिरिक्त थांबे; कोणत्या स्टेशनवर किती वाजता येणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी (Indian Railway) मोठी आनंदाची बातमी आहे. मिरज ते हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसला (Miraj to Hazrat Nizamuddin Express)  अतिरिक्त ४ थांबे देण्यात आले आहेत. १८ ऑगस्ट पासून ही सेवा सुरु करण्यात आली असून रेल्वेच्या या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे तसेच प्रवाशांची कोणतीही गैरसोय यामुळे होणार नाही.

यापूर्वी निजामुद्दीन-मिरज एक्स्प्रेसला महाराष्ट्रातील मिरज, पुणे, लोणावळा, कल्याण आणि वसई रोड या ठिकाणीच थांबे होते. परंतु रेल्वेने (Indian Railway) नुकत्याच घेतलेल्या नव्या निर्णयानुसार आता सांगली, कराड, सातारा आणि जेजुरीला ही रेल्वे थांबणार आहे. यामुळे या भागातील प्रवाशांसाठी ही मोठी उपलब्धी असेल. निजामुद्दीन-मिरज एक्स्प्रेस १२४९४ ही हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकातून दर शुक्रवारी सुटते. आणि रविवार पर्यंत मिरजला येते. आणि नंतर रविवारी मिरज स्थानकातून हजरत निजामुद्दीन स्थानकाकडे जाण्यासाटी सुटते

कोणत्या स्थानकावर किती वाजता ट्रेन थांबणार- (Indian Railway)

मिरजवरून हजरत निजामुद्दीन स्थानकाकडे जाताना-

मिरजहून रविवारी पहाटे ४.५० मिनिटांना सुटेल
सांगली स्थानकात ५.०२ वाजता
कराड स्थानकात ६.०२ मिनिटांनी
सातारा स्थानकात ७.०७ मिनिटांनी
जेजुरी स्थानकात ८.४३ वाजता ही ट्रेन थांबेल

निजामुद्दीनहून मिरजकडे जाताना –

जेजुरी स्थानकावर शनिवारी रात्री ७. ४८ वाजता
साताऱ्यात शनिवारी रात्री ९.४२ वाजता,
कराडमध्ये शनिवारी रात्री १०.३७ वाजता
सांगलीत शनिवारी रात्री ११ वाजून ५२ मिनिटांनी

या एकूण सर्व स्थानकामधील कराड, सातारा, आणि सांगली या तिन्ही स्थानकांवर ही रेल्वे प्रत्येकी 3 मिनिटांचा थांबा घेईल तर जेजुरी स्थानकावर 2 मिनिटांचा थांबा घेईल .