टेन्शन वाढलं! नव्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळं ठाकरे सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

0
30
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या (Coronavirus new strain) नव्या विषाणूने आता भारतातही प्रवेश केला आहे. देशात कोरोनाच्या नव्या विषाणूचे जवळपास 20 पॉझिटिव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातही या कोरोनाचा भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं जाहीर केलेल्या ‘मिशन बिगीन अगेन’ची नियमावली (Mission Begin Again Guidelines) आता 31 जानेवारी 2021 पर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. राज्य शासनानं याबाबत आदेशही जारी केले आहेत. कम्टेन्मेंट झोनमधील निर्बंध 31 जानेवारीपर्यंत कायम राहणार आहेत. तसेच आपत्कालीन सर्व नियमावली आधीच्या लागू राहतील, असं सांगण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी केलेल्या कामगिरीवर समाधानी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, 31 डिसेंबर नववर्ष स्वागत सर्वांनी केले पाहिजे. पण रात्री 11 नंतर हाॅटेल्स पब्स बंद राहील. मरीन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया येथे गर्दी करू नये, चार पेक्षा जास्त लोक एकत्रित आले तर कारवाई केली जाईल, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. दुसरीकडे, ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी काही प्रवाशांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले तर देशात नव्या स्ट्रेनचे काही रुग्ण सापडल्यानं केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचलली आहेत. केंद्र सरकारनं 31 डिसेंबरपर्यंत ब्रिटन, लंडनला (युके) जाणारी विमानसेवा स्थगित केली होती. आता ही मुदत वाढवण्यात आली आहे. आता युकेला जाणाऱ्या विमानांचं उड्डाण 7 जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here