आमदार बोरनारे यांचे प्रकरण विधानसभेत आणणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – भावजयीला मारहाण करणारे वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजप महिला आघाडी व तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची औरंगाबादेत भेट घेतली. संबंधित प्रकरणाचे गांभीर्य समजून घेत फडणवीस यांनी विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

भाजपच्या कार्यक्रमात हजेरी लावली म्हणून रमेश बोरनारेसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी भावजयीसह भावाला बेदम मारहाण करून जखमी केले. त्यानंतर जखमी भाऊजी वरच सत्तेचा गैरवापर करून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. यासाठी आमदार बोरणारे यांनी खाजगी सचिव यांचा वापर केला. बोरणारे कुटुंबियांनी महिलेला मारहाण केल्याची ही तालुक्यातील दुसरी घटना समोर आली. सत्तेचा गैरवापर करणाऱ्या आमदारांवर कडक कारवाईची मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने फडणवीसांकडे केली.

बोरनारे कुटुंबीय तसेच त्यांचे समर्थक काही दिवसांपासून मस्तवालपणे वागत आहेत. महिला मारहाण प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप पदाधिकारी यांना देखील आमदार बोरनारे यांनी एका एकाला पाहून घेतो अशी धमकी दिल्याचे शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. सर्व प्रकार गंभीरतेने समजून घेत फडणवीस यांनी विधानसभेत उठवणार असून मस्तवालपणे वागणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाईची मागणी केली जाईल, असे त्यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.