हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत माणुसकीच्या नात्यानं काही सेवाभावी संस्था कोविड रुग्णांच्या मदतीला धावून येत आहेत. पण एका आमदाराचा फोटो पाहून मात्र तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. या आमदारांना कोरोना रुग्णांची पूर्णपणे काळजी घेता यावी म्हणून कोबिर सेंटरमध्ये त्यांनी आपला मुक्काम ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आमदारांचे नाव आहे निलेश लंके.राष्ट्रवादी काँग्रेस अपडेट या फेसबुक पेजवर त्यांचा फोटो अपलोड करण्यात आला आहे. आमदार खासदार म्हंटल कि त्यांचा थाट माट डोळ्यासमोर येतो. मात्र निलेश लंकेच्या या फोटोमुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोना ग्रस्तांना योग्य उपचार मिळावा म्हणून निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावानं तब्बल एक हजार बेडचे कोविड केअर सेंटर दोन ठिकाणी उभारले आहे. सर्व सोयीसुविधांनी युक्त असे हे कोविड सेंटर आहे. लंके यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या या सेंटरमध्ये जेवणाची तसेच उपचाराची सोय आहे. याच कोविड सेंटरमुळे लंके यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली त्यानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत कोरोना रुग्णांची पूर्णपणे काळजी घेता यावी म्हणून त्यांनी कोविड सेंटरमध्ये मुक्काम ठोकला आहे.
या फोटोमध्ये निलेश लंके कोणताही बडेजाव न मिरवता गरीब आणि सामान्य लोकांमध्ये झोपताना दिसत आहेत काहीही नसताना एक शांत झोप घेताना दिसतात त्यांच्या आजूबाजूला नागरिक आराम करत आहेत. लंके यांच्या आजूबाजूला झोपलेले कोरोना ग्रस्त आहेत की नेमके कोण? हे सांगणं कठीण असलं तरी ते कोविड सेंटरच्या परिसरात झोपलेले असल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत. त्यांचा हा फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे.