टीम हॅलो महाराष्ट्र । संगमनेर येथे आयोजित मेधा महोत्सवात ‘सवांद तरुणाईशी’ कार्यक्रमात दिग्दर्शक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी महाराष्ट्रातील तरुण आमदारांची ही मुलाखत घेतली. या कार्यक्रमात धीरज देशमुख, आदिती तटकरे, आदित्य ठाकरे, रोहीत पवार, झिशान सिद्दीकी, ऋतुराज पाटील हे सर्व तरुण आमदार सहभागी झाले होते. यावेळी सर्व आमदारांनी दिलखुलास चर्चा करत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.
या कार्यक्रमा दरम्यान अवधूत गुप्ते यांनी आपला मोबाइल काढत थेट रोहित पवार यांच्या हातात देत पवार साहेबांना फोन करायाला सांगितला. यांवर रोहित पवार यांनी पवार साहेबांशी सारखं बोलणं होतंच असंत तेव्हा दुसऱ्या कोणाला फोन लावू का? असं विचारात थेट पंतप्रधान मोदींना फोन लावतो असं म्हणताच कार्यक्रमाला उपस्थित तरुण वर्गाने जोरदार शिट्ट्या आणि टाळ्यांचा प्रतिसाद दिला.
फोनवर काय बोलले रोहित पवार
गुजरात हा महाराष्ट्राचा शेजारी असल्यानं त्यामुळं मी मराठीच त्यांच्याशी बोलतो; कदाचित त्यांना मराठी आता येतच असं म्हणतं मोदींना फोन लावत रोहित म्हणाले, ” हॅलो, मोदीसाहेब नमस्ते, मी रोहित पवार बोलतोय. नाव आपण ऐकलं असेल. थोरात साहेबांनी आज एका कार्यक्रमात बोलावलं होतं त्याकरिता संगमनेर येथे आलो आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आलं आहे. गेल्या ५ वर्षात जो विकास रखडला तो आम्ही करूच. मात्र माझ्यासमोर अनेक युवक युवती येथे उपस्थित आहेत. त्यांना उद्याच्या काळात चांगल्या नोकऱ्या मिळण्यासाठी केंद्र सरकारचे जे औद्योगिक धोरण थोड अडचणीचं झालं आहे ते तुम्ही बदला. त्यातून युवकांना नोकऱ्या मिळतील.देशातील शेतकऱ्यांची अवस्था विजेट त्याकडे तुम्ही लक्ष घाला. अशी मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्या सरकारचे फक्त चार वर्ष राहिले आहेत. तेव्हा तुमच्या सरकारमध्ये थोडासा बदल करा. आम्ही सर्व खुश आहोत. इतकेच बोलतो तुम्ही फार बिझी असाल याची कल्पना आहे म्हणून फोन ठेवतो धन्यवाद! असं म्हणत रोहित पवार यांनी फोन ठेवला.
हा फोन चालू असताना युवकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न फोनवर मांडत असताना उपस्थित तरुण मंडळींनी रोहित यांना उस्फुर्त दाद दिली. रोहित यांनी लावलेला हा फोन केवळ एक गमतीचा भाग जरी असला तरी त्यांचे फोनवरील संभाषण सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.