गांधीगिरी! शेतकऱ्यांचं पीक कर्ज मंजूर व्हावं म्हणून आमदाराने चक्क बँक मॅनेजरचे पाय धुवून फुले वाहिली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड । शेतकऱ्यांचं पीक कर्ज मंजूर व्हावं म्हणून भाजपचे आमदार सुरेश धस (suresh dhas) यांनी चक्क बँक मॅनेजरचे (bank manager) पाय धुऊन त्यांना फुले वाहत त्यांच्या पाय पडले. धस यांच्या या अनोख्या गांधीगिरी आंदोलनामुळे आता तरी बँकेकडून पीक कर्जांना मंजुरी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

सुरेश धस यांनी बँक मॅनेजरला त्यांच्या घरी बोलावले. या मॅनेजरला खुर्चीत बसवून त्यांना पाटावर पाय ठेवायला लावले. त्यानंतर पाण्याने त्यांचे पाय धुतले. टिश्यू पेपरने बँक मॅनेजरचे पाय पुसल्यानंतर त्यांच्या डोक्यावर फुले टाकून त्यांच्या पायावरही फुले ठेवली. त्यांच्या पायाही पडले. त्यानंतर धस यांनी लॉकडाऊनमुळे शेतकरी खायला मोताद झाला आहे. त्यांचं पीक कर्ज मंजूर करा. या शेतकऱ्यांना हवालदिल करून आत्महत्येस प्रवृत्त करू नका, अशी विनंती बँक मॅनेजरला केली.

आष्टी तालुक्यातील आष्टा हरिनारायण गावात देखील पीककर्ज वाटपाचा पुरता फज्जा उडालेला आहे. येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या व्यवस्थापकांना वारंवार भेटून विनंती करून देखील पीककर्ज वाटप यंत्रणेत काहीच बदल होत नव्हता. बँकेच्या शाखेमध्ये बारा गावातील शेतकऱ्यांची १७०० पीक कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत. शेतकरी खेटे मारून दमले पण मंजुरी मिळत नव्हती. शेवटी काल गांधीगिरीचा मार्ग अवलंबत बँक शाखा व्यवस्थापकांचे पाय धुवून, फुले वाहून आहेर करत शेतकऱ्यांची पीक कर्ज मंजूर करण्याची विनंती केली, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

https://www.facebook.com/watch/?v=368503697492264&extid=HN1wRxZHfYyVesDf

बँकेत शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे ९ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यातील फक्त ५० फायली मंजूर झाल्या आहेत. बँकेकडून अत्यंत संथगतीने कारभार सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप असून या शेतकऱ्यांनी धस यांच्याकडे गाऱ्हाणी केली होती. त्यामुळे धस यांनी ही बँकेत खेटा मारूनही कर्ज मंजुरी होत नव्हती. अखेर त्यांनी हा गांधीगिरीचा मार्ग अवलंबला. सध्या बीडमध्ये धस यांच्या या गांधीगिरीची जोरदार चर्चा सुरू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment