येत्या 3 तारखेपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दांडिया , गरबा चे आयोजन केले जाते. म्हणूनच प्रवाशांची सोय व्हावी याकरिता मुंबई मेट्रो कडून जादा फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. MMRDA चे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांनी याबाबतची घोषणा केली आहे
‘या’ काळात अतिरिक्त मेट्रो धावणार
रात्री उशिरा येणाऱ्या प्रवाशांना नवरात्री उत्सवात सहभागी होण्यासाठी 7 ऑक्टोबर ते दिनांक 11 ऑक्टोबर 2024 दरम्यान अतिरिक्त मेट्रो सेवा पुरवल्या जातील. 7 ऑक्टोबर ते दिनांक 11 ऑक्टोबर 2024 दरम्यान पंधरा मिनिटांच्या अंतराने दररोज 12 अतिरिक्त ट्रिप चालवले जातील. जेणेकरून मध्यरात्री उत्सवाला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना सोयीस्कर आणि आर्थिक दृष्ट्या प्रवास करता येईल.
याबाबत माहिती देताना, एम एम ओ सी एल चे अध्यक्ष संजय मुखर्जी म्हणाले की नवरात्र हा सण आहे जो लोकांना आणि सर्व भाविकांना एकत्र आणतो आणि ही आपली जबाबदारी आहे. मेट्रोण्या सेवेचा विस्तार करून नागरिकांसाठी कार्यक्षम आणि सुरक्षित वाहतूक उपलब्ध करून देणे आम्ही हे सुनिश्चित करत आहोत की रात्री उशिरा उत्सवा दरम्यान प्रवाशांना प्रवासाचा एक सोपा आणि आरामदायी पर्याय उपलब्ध आहे.
नवरात्र काळात 294 फेऱ्या
एम एम ओ सी एल चे व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल म्हणाले, ‘आम्ही आमच्या प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि नवरात्र उत्सवावर मेट्रोच्या वेळा वाढवण्याचा निर्णय प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरेल. 7 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर पर्यंत नवरात्रीसाठी अतिरिक्त 12 फेऱ्या वाढवतील परिणामी एकूण 294 फेऱ्या होतील