हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी काळात मनसे- शिवसेना एकत्र येणार का या प्रश्नावर बोलताना राज ठाकरेंनी परमेश्वराला ठाऊक अस मोघम उत्तर दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं, परमेश्वरावर विसंबून राहायचं नसत असा टोला राऊतांनी लगावला होता. यावर आता मनसे कडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी ट्विट करुन संजय राऊतांवर निशाणा साधला. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं. संजय राऊत यांचं हे म्हणणं अगदी बरोबर आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे स्वत:चं राजकारण स्वत:च करतात. पण तुम्हाला मात्र निवडणुकीत राजकारण करण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची गरज लागते. तसेच वारंवार आमचे दैवत परमेश्वर म्हणून त्यांच्यावर विसंबून राजकारण करतात, असा टोला देखील अखिल चित्रे यांनी संजय राऊतांना लगावला आहे.
राजकारण हे आपलं आपण करायचं असतं, @rautsanjay61 आपलं म्हणणं अगदे बरोबर.#राजसाहेब स्वत:चं राजकारण स्वत:च करतात पण तुम्हाला मात्र प्रत्येक निवडणुकीत राजकारण करण्यासाठी स्व.बाळासाहेबांची गरज लागते,वारंवार ‘आमचे दैवत’ परमेश्वर म्हणून त्यांच्यावर विसंबून राजकारण करता #भंपकसमनावीर
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) June 5, 2021
संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते –
परमेश्वर हा कुठल्याही पक्षाचा मेंबर नसतो, तो कधीच मध्यस्थाची भूमिका घेत नाही. जो परमेश्वरावर विसंबून राजकारण करतो त्याला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं, असे म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.