Monday, January 30, 2023

नववधूला शेजारीण म्हणाली काळी अन् दोन कुटुंबातील बायकांत झाली हाणामारी

- Advertisement -

मध्यप्रदेश : वृत्तसंस्था – लग्नाच्या बाबतीत समाजामध्ये वेगवेगळे रीतिरिवाज असतात.यामधील एक रिवाज म्हणजे नवरीचा चेहऱ्या बघण्याचा कार्यक्रम. यामध्ये काही महिलांना बोलावून हा कार्यक्रम केला जातो. मात्र मध्यप्रदेशमध्ये अशी एक घटना घडली आहे त्यामध्ये नवरीचा चेहरा बघण्याच्या कार्यक्रमात महिलांमध्ये हाणामारी झाली आहे. हा वाद एवढा वाढला कि हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले.

हि घटना मध्य प्रदेशातील कछपुरा गावामध्ये घडली आहे. नव्या नवरीचा चेहरा दाखवण्याचा कार्यक्रमात झालेल्या हाणामारीवरून पोलिसात दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या. या प्रकरणात नवरीचा चेहरा दाखवण्यासाठी शेजारील महिलांना बोलावण्यात आले होते. त्यातील एक महिला म्हणाली की, नवरी काळी आहे. त्यावर दुसऱ्या एका महिलेनं चिडून गोऱ्या मुली तर पळून जातात, असे म्हटले. यावरून शेजारीच उभी असलेली गोऱ्या रंगाची मुलगी संतापली आणि महिलांमध्ये वाद सुरु झाला.

- Advertisement -

या प्रकरणात ती महिला आणि त्या मुलीच्या कुटुंबीयांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. हा वाद एवढा वाढला कि या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये महिलेने त्या मुलीच्या पोटावर चावा घेऊन तिचे केस ओढले. या प्रकरणानंतर दोन्ही बाजूंनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. नवरीचा चेहरा दाखवण्याच्या कार्यक्रम सुरळीत चालला होता. यामध्ये गावातील रेखा नावाच्या महिलेने शेजारी उभ्या राहिलेल्या १७ वर्षीय किशोरी नावाच्या मुलीकडे बघून गोऱ्या रंगाच्या मुली तर पळून जातात असा टोमणा मारला तसेच गोऱ्या रंगाच्या मुलींचे अनेक मुलांसोबत चक्कर चालू असतात, त्या कधी त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत पळून जातात असे म्हंटले.

हे ऐकून किशोरी नावाची मुलगी चांगलीच संतापली. या प्रकरणानंतर ती मुलगी चिडून तिच्या घरी निघून गेली आणि तिने घडलेला सर्व प्रकार आईला आणि कुटुंबियांना सांगितला. यानंतर हा वाद आणखी वाढला. या प्रकारावरून संतापलेल्या टोमणा मारणाऱ्या महिलेने किशोरीला मारहाण करण्यास सुरुवात केली.यानंतर त्या महिलेने किशोरीच्या पोटाला चावा घेतला आणि त्यानंतर दोघी बहिणींनी मिळून टोमणा मारणाऱ्या महिलेला बेदम मारहाण केली.