हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एक जबरदस्त सनसनाटा ‘वाद’ आणि ‘इंडियन आयडॉल १२’ हे आजकाल नवं नवं एकमेकांच्या प्रेमात असणार समीकरण आहे. आजकाल नेहमीच ह्या ना त्या कारणामुळे हा शो रोज फिरून फिरून वादाच्या भोवऱ्यात सापडतो. विशेष म्हणजे शोचं ठीक आहे पण होस्टच काय..? त्याला काय झालय. तोही रोज नव्या मुद्द्यांवरून वादात येऊ लागलाय. आता काय तर.. इंडियन आयडॉल होस्ट करणाऱ्या आदित्य नारायणने नुकत्याच पार पडलेल्या भागात शो सुरु असताना एका स्पर्धकाबरोबर बोलताना ”राग पट्टी ठिक से दिया करो, हम क्या अलिबागसे आये है क्या” ? असे म्हटले. मग काय..? नेमके हेच शब्द त्याच्या चांगलेच अंगाशी आले आहेत. मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी त्याच्या वक्तव्याबाबत राग व्यक्त केला आहे.
https://www.facebook.com/ameya.khopkar/videos/10160944223995550
आदित्यच्या या वक्तव्यामूळे नवा वाद उपस्थित होणे अगदीच साहजिक आहे. अलिबागविषयी असे बोलणे निश्चितच प्रेक्षकांनाही चांगलेच खटकले. आदित्यचे नॅशनल चॅनेलवर एखाद्या भागाविषयी अश्या बाबतीचे वक्तव्य करण्यावर रसिकांनाही चांगलाच संताप व्यक्त केला आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही आदित्यचा चांगलाच समाचार घेतला आहे. सोबतच आदित्यने शो दरम्यान अलिबागकरांचा अपमान केल्यामुळे शोमध्येच त्याने जाहीर माफी मागावी अन्यथा कानाखाली आवाज काढला जाईल अशा शब्दात आदित्यला दम भरला आहे.
https://www.instagram.com/p/CK3VYPcjzBW/?utm_source=ig_web_copy_link
मनसे चित्रपट कर्मचारी सेने अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुक लाईव्हद्वारे अआदित्य नारायणाच्या उद्धटपणाबद्दल आणि इंडियन आयडॉल शोबद्दल संताप व्यक्त केला आहे. सोबत ते म्हणाले, हिंदी चॅनेलवर अनेकदा कलाकार अलिबागसे आये है क्या म्हणताना दिसतात. अशा लोकांना अलिबागची संस्कृती माहिती नाही? आमच्या अलिबागची लोकं माहिती नाहीय..? ”अलिबागकरांचा हा अपमान आहे. ही कोणती बोलायची पद्धत झाली. मनसे चित्रपट सेनेकडूनही या गोष्टीचा मी निषेध करतोय.
https://www.instagram.com/tv/CPK-V9Ynd_l/?utm_source=ig_web_copy_link
इतकेच नव्हे तर अमेय खोपकरांनी आदित्य नारायणचे वडिल गायक उदित नारायण यांनाही घडलेल्या प्रकाराविषयी माहिती दिली आणि त्यांना लेकाच्या प्रतापाबाबत माहिती दिल्याचे योग्य त्या भाषेत बोलणे झाले असल्याचे त्यांनी या लाईव्ह मध्ये सांगितले. तसेच सोनी चॅनेललाही आगामी भागात अलिबागच्या नागरिकांची माफी मागण्यास सांगितले आहे. सोनीच नाही इतर शोमध्येही अनेकदा अलिबागबद्दल असंच काहीही अपमानस्पद कलाकार बोलताना दिसतात. यापुढे अजिबात हे असलं खपवून घेतले जाणार नाही. यापुढे असे काही अपमानास्पद ऐकायला मिळाले तर योग्य ती कारवाई केली जाणार असा कडक इशारा त्यांनी दिला आहे.