हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने सगळीकडे हाहाकार उडाला असून मृत्यू होणाऱ्या लोकांचं प्रणाम देखील वाढलं आहे. कोरोना मुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली असून गरीब जनतेला धीर देण्याची गरज आहे. तर दुसरीकडे ठाकरे सरकारनं मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीसाठी ९०० कोटींचे टेंडर काढले आहे.. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारला एक आवाहन केले आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत मागणी केली आहे. कोरोना ने अनेक परिवार उध्वस्त केले, यातील अनेकांची आर्थिक स्थिती देखील हलाखीची आहे त्यामुळे कोरड्या सहानुभूतीची नव्हे तर भरीव मदतीची आवश्यकता आहे. नियोजित आमदार निवास कधीही बनवता येईल परंतु तेवढ्याच खर्चात (900 करोड) मृत्युमुखी पडलेल्याना प्रत्येकी 1 लाख रुपये देता येतील व ते देणे उचित ठरेल, अशाने त्यांना खरच मोठा आधार भेटेल अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कोरोना ने अनेक परिवार उध्वस्त केले, यातील अनेकांची आर्थिक स्थिती देखील हलाखीची आहे त्यामुळे कोरड्या सहानुभूतीची नव्हे तर भरीव मदतीची आवश्यकता आहे. नियोजित आमदार निवास कधीही बनवता येईल परंतु तेवढ्याच खर्चात (900 करोड) मृत्युमुखी पडलेल्याना प्रत्येकी 1 लाख रुपये देता येतील व ते
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) May 23, 2021
बाळा नांदगावकर यांनी कोरोनाच्या संकटात राज्य सरकार आणि नागरिकांना नेहमीच मदत केली आहे. कोरोनाच्या उपाययोजना करण्यासाठी आपले एक महिन्याचे मानधन मुख्यंत्री सहाय्यता निधीत देऊन इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केले होते. तसेच कोरोनामुळे ज्या मुलांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे अशा मुलांना मदत करण्याचीही मागणी केली होती
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.