मुंबई । मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी वाशी न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला आहे. राज ठाकरे वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणीयांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केलं होतं. राज ठाकरेंना 15 हजारांंच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर, पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार असून या सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली आहे.
26 जानेवारी 2014 रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर मनसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज ठाकरेंना यापूर्वी 2018 आणि 2020 मध्ये समन्स काढण्यात आले होते. मात्र, त्यावेळी राज ठाकरे उपस्थित राहिले नव्हते.
त्यामुळे राज ठाकरेंना जानेवारी महिन्यात वॉरंट बजावण्यात आलं होतं. मनसेच्या विधी व न्याय विभागाची फौज वाशी न्यायालय परिसरात दाखल झाले आहे. राज ठाकरेंना जामीन मंजूर होणार असल्याचं आशा अॅड. रविंद्र पाष्टे यांनी सांगितलं होतं. मनसेच्या विधी विभागाचे वकील मोठ्या संख्येने वाशी न्यायालय परिसरात उपस्थित होते.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.