कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांचे प्रश्न व अडीअडीचणी सोडवण्यासाठी मनसे कटीबद्ध आहे. जनतेचा हाच विश्वास असल्याने मनसेच्यावतीने राबवण्यात येत असलेल्या सभासद नोंदणी अभियानास नागरीकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिपादन मनसेचे जिल्हाअध्यक्ष अँड. विकास पवार यांनी केले.
मनसेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या सभासद नोंदणी अभियानास अँड. विकास पवार यांच्या हस्ते कराड शहरात प्रारंभ झाला. यावेळी, उपजिल्हाअध्यक्ष महेश जगताप, तालुकाअध्यक्ष दादासाहेब शिंगण, शहर अध्यक्ष सागर बर्गे, सतीश यादव, नितीन महाडीक, संदीप लोंढे, राजेंद्र कांबळे, उत्तम बागल, संभाजी सकट, झुंझार यादव, अमोल हरदास, शिवराज यादव, बळासाहेब सातपुते, रोहित मोरे, आबा गडाळे, प्रतिक पवार व मनसैनिक उपस्थीत होते.
सागर बर्गे म्हणाले की, महाराष्ट्राचे नवनिर्माण करण्यासाठी स्थापन झालेल्या मनसेला पंधरा वर्षे पुर्ण झाली आहेत. जनतेचे प्रश्न व समस्या सोडवण्याबरोबरच आज राज्यात भक्कम विरोधी पक्ष म्ह्णुन मनसे सक्षमपणे काम करीत आहे. राज्यात तिन पक्षाच्या सरकारचे त्रांगडे असल्याने जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. अशावेळी मनसेकडुन लोकांना अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी मनसे काम करत आहे. सभासद नोदंणी अभियानाल मिळणाऱया प्रतिसादातुन लोकांचा मनसेवरील विश्वास स्पष्ट होत आहे. विषेश करून युवा वर्गाचा सभासद नोंदणी अभियानास मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सागर बर्गे यांनी सांगीतले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा