भाजपसोबत युती करणार का ?? मनसेकडून मिळाले ‘हे’ उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढल्यामुळे भाजपची चांगलीच दमछाक होऊन भाजपला पराभवाचे तोंड पाहावं लागलं. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत देखील महाविकास आघाडी एकत्रच निवडणूक लढवण्याची शक्यता असून आता भाजप आणि मनसे देखील एकत्र येणार का असा प्रश्न समोर असताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेने अमराठी लोकांबद्दलच्या त्यांच्या भूमिकेत बदल केल्यास विचार करू अशी प्रतिक्रिया दिली होती.

फडणवीस यांच्या या प्रतिक्रिये नंतर मनसे भाजपसोबत युती करणार का याबाबत मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, ‘फडणवीस यांनी एका वेगळ्या प्रश्नावर उत्तर देताना जे वक्तव्य केलेय यामुळे पालिका निवडणुकीसाठी त्यांनी हात पुढे केलाय की नाही हे आत्ताच सांगत येणार नाही. याबाबतचे निर्णय राज ठाकरेच घेत असतात, आज याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.’

पुढे त्यांनी म्हटलं की, ‘मनसेचा जन्मच भूमिपुत्रांसाठी, मराठीसाठी झालाय, यामुळे याबाबत कोणालाही शंका घ्यायचं कारण नाही, अमराठीचा मुद्दा हा गैरसमजातून आलाय, मराठीचा आदर अमराठी लोकांनी करावा, आम्ही काही मुद्दाहून कोणाला मारहाण करत नाहीत. मराठीचा मुद्दा मनसे कधीही डावलणार नाही.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment