मनसे नेते राज ठाकरे अतितला थांबणार : स्वागताची जय्यत तयारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज कोकण दौऱ्यावर निघाले आहेत. या दाैऱ्यावर जाताना सातारा, कोल्हापूर मार्गे जाताना कार्यकर्त्याच्या भेटीगाठी घेणार आहेत. आज 11.30 वाजण्याच्या सुमारास साताऱ्यातील अतीत येथे थांबणार असून भेटीगाठी घेणार आहेत. तसेच अतित गावात राज ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

राज ठाकरे सातारा जिल्ह्यातील अतीत गावचे शिवचरित्र अभ्यासक यांच्या घरी जाणार आहेत. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी कमानी सजावण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर गावामध्ये त्यांच्या आगमनाची जय्यत तयारी ग्रामस्थांनी केली आहे. सर्वसामान्य कुटूंबात राहणारे शिवचरित्र अभ्यासक आनंदराव जाधव यांचं साधेसाधू घर आहे. तरीही सामान्य कुटुंबात राज ठाकरे भेटणार असल्याने सामान्य लोकांच्यात कुतूहूल आहे.

सातारा जिल्ह्यातील या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. तसेच सध्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जी काही वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्याबाबत काही चर्चा होवू शकते, त्यासाठीच ही भेट प्रामुख्याने घेतली जात असल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे अतित येथील भेटीनंतर कोल्हापूरला रवाना होतील, तेथून ते पुढे कोकण दाैऱ्यावर जातील.