‘हर हर महादेव’ चित्रपटावरून मनसेने Facebook पोस्टद्वारे केली ‘ही’ मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘हर हर महादेव’ हा चित्रपट सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी काल ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा चालू शो बंद पाडला. मात्र, आव्हाड यांनी पाठ फिरवताच मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी शो पुन्हा चालू केला. ठाण्यात घडलेल्या घटनेनंतर मनसेचे जाधव यांनी हा चित्रपट मोफत दाखवण्यात येणार असल्याची घोषणाही केली आहे. यामुळे आता राजकारण अजून तापण्याची शक्यता आहे.

यानंतर आज अविनाश जाधव यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्टर शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. ‘मंगळवार, दि. 8 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.15 वाजता ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेवचा मोफत शो दाखवण्यात येणार आहे. याचे आयोजक मनसे आहे’, अशी माहिती त्यांनी या पोस्टरद्वारे दिली आहे.

https://www.facebook.com/photo.php?fbid=670680541081457&set=a.537657667717079&type=3

हर हर महादेव या चित्रपटात निर्माते अभिजित देशपांडे यांनी चुकीचा इतिहास दाखवला गेला आहे. या चित्रपटात शिवाजी महाराज यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला आहे, असे सुरुवातीला राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. याच कारणावरून काल ठाणे येथील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावेळी त्यांनी चित्रपटगृहातील सर्व लोकांना बाहेर काढले. उपस्थित प्रेक्षकांपैकी काहींनी त्यांना विरोधही दर्शवला. यादरम्यान विरोध दर्शवणाऱ्या एका प्रेक्षकाला कार्यकर्त्यांनी मारहाण देखील करण्यात आली.

राष्ट्रवादीने हर हर महादेव चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये राडा घातल्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी 5 मिनिटात विवियाना मॉल गाठून चित्रपट पुन्हा सुरू करण्यास सांगितले. यानंतर अविनाश यांनी स्वत: चित्रपटगृहात बसून संपूर्ण चित्रपट पाहिला.