Monday, February 6, 2023

गुटखा खा, दारू प्या, पण…; भाजप खासदाराचे अजब विधान

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी पाण्याचे महत्त्व सांगताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पाणी वाचवलं पाहिजे. गुटखा खा, दारू प्या, पण पाण्याचे महत्त्व समजून घ्या, आणि पाण्याची बचत करा असं त्यांनी म्हंटल आहे. त्यांच्या या विधानाने नवा वाद होण्याची शक्यता आहे.

रीवाचे खासदार जनार्दन मिश्रा हे मध्य प्रदेशच्या स्थापना दिनानिमित्त रीवा येथील कृष्णा राज कपूर सभागृहात जलसंधारण आणि संवर्धन या कार्यशाळेत जनतेला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, काही सरकार पाणी कर माफ करणार असल्याचे सांगतात, मात्र पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात असल्याने आम्हाला पाणीपट्टी भरावी लागत आहे. अशा परिस्थितीत पाण्याची उपयुक्तता समजून घ्यावी लागेल. सर्व नद्या, नाले कोरडे पडले आहेत. पृथ्वीवर पाणी शिल्लक नाही. पाण्याची पातळी कमी होत आहे. आपण पाण्याची नासाडी करत आहोत.

- Advertisement -

ते पुढे म्हणाले, तुम्ही दारू प्या, गुटखा खा, थीनरचा वास घ्या किंवा आयोडेक्स खा. पण पाण्याचे महत्त्व समजून घ्या. प्रत्येक व्यक्तीला घरात शुद्ध पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे. त्यासाठी सरकारने ‘हर घर जल’ योजना केली आहे. यामध्ये सहकार्य हवे. पाणी समित्या स्थापन करून पाणीपट्टी भरावी, तरच योजना यशस्वी होईल.