युतीच्या मुद्द्यावरून भाजप – मनसेमध्ये खडाजंगी ; राजू पाटलांनी आशिष शेलारांना फटकारले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यात भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप-मनसे एकत्र येण्याची शक्यता आहे. दरम्यान याच वरून मनसे आमदार राजू पाटील आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली.

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी अजून तरी भाजपा-मनसे युतीची बातचीत झालेली नाही. आम्ही एकट्याच्या जीवावरच इतिहास घडवणार आहोत, असं विधान केलं होतं. आशिष शेलार यांच्या या वक्तव्यानंतर मनसेने देखील प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही कुठे त्यांना विचारायला गेलो आहे की आम्हाला युतीत घ्या?, उगीचंच काहीतरी झगा मगा आणि माझ्याकडे बघा. आम्ही विचारायला आलो तर प्रतिक्रिया द्या ना,’ असं म्हणत राजू पाटील यांनी आशिष शेलार यांना फटकारलं आहे.

मनसेने पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर हिंदुत्वाच्या मार्गावर पक्ष लक्ष केंद्रीत करत असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात भाजप आणि मनसेची युती होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण मनसेची उत्तर भारतीयांविरोधाची भूमिका मवाळ झाली तर पुढचा विचार होऊ शकेल, असं भाजपकडून विधान करण्यात आलं होतं. आता राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यानं ही मनसे आणि भाजपच्या युतीची नांदी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’