पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! 1 फ्रेब्रुवारी पासून काढता येणार नाहीत ATM मधून पैसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये ग्राहकाला 1 फेब्रुवारी पासून एटीएम मधून पैसे काढायचे असल्यास ‘नॉन ईव्हीएम एटीएम मशीन’मधून पैसे काढता येणार नाहीत.

पंजाब नॅशनल बँकेने ही गोष्ट ग्राहकांच्या हितासाठी समोर आणली असून, यामुळे ऑनलाइन फसवणुकीला आळा घालता येऊ शकतो. मागील काही दिवसांपूर्वी पंजाब नॅशनल बँकेच्या ॲप मधून एटीएम कार्ड बंद करून ठेवता येईल अशी सुविधा बँकेने त्यांच्या ग्राहकांना उपलब्ध करून दिली होती. सोबतच एक फेब्रुवारीपासून पुढे नॉन ईव्हीएम एटीएम मशीन मधून पैसे काढता येणार नसून यामुळे ऑनलाइन फसवणुकीला आळा बसू शकेल असे बँकेचे म्हणणे आहे.

नॉन ईव्हीएम एटीएम मशीन म्हणजे काय?

ईव्हीएम एटीएम मशीन म्हणजे यामध्ये पैसे काढण्यासाठी कार्ड न वापरता, कार्डवरील स्ट्रीप मध्ये संपूर्ण माहिती स्टोर केलेली असते व कार्ड मशीनमध्ये घातल्यानंतर ट्रांजेक्शन पूर्ण होईपर्यंत काढ बाहेर काढता येत नाही. यामध्ये अनेक प्रकारच्या फसवणुकीचे गुन्हे समोर येत होते त्याला समोर ठेवून पंजाब नॅशनल बँकेने हे पाऊल उचलले असल्याचे समजते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”. आढळले.

Leave a Comment