टीम हॅलो महाराष्ट्र । राजकीय अस्तित्वासाठी झगडणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन पार पडत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं अभिवादन करून राज ठाकरे यांनी केली अधिवेशनाला सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं आहे. या नवीन झेंड्यावर रेल्वे इंजिन जाऊन त्याची जागी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. मनसेचा नवा झेंडा कसा असेल याची अनेकांना उत्सुकता होती. या झेंड्याचा फोटो काही दिवसांपूर्वी समोर आला होता. मात्र पक्षाकडून अधिकृत घोषणा झाली नव्हती. आज अखेर राज ठाकरे यांनी अधिकृतपणे नव्या झेंड्याचं अनावरण केलं.
याआधी मनसेने अधिकृत ट्विटर हँडलवरुन पक्षचिन्हाच्या मागे असलेला झेंडा हटवला होता. त्याआधीपासून मनसे झेंडा बदलणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र ट्विटरवर बदल केल्यानंतर तसे संकेत मिळाले होते.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”