आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्वातंत्र्य दिन विशेष २०१९ । नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानच्या सहकार्याने आझादहिंद फौजेची स्थापना केली होती. ब्रिटिश सैन्यात काम करणार्या अनेक भारतीय नौजवानांना आपल्या फौजेत सामिल करुन घेण्यात त्यांना यश आले होते. आझादहिंद फौजेचे तुफान काम चालू होते. इंग्रजांच्या सैन्याला आझादहिंद फौजेच्या सैनिकांनी सळो की पळो करुन सोडले होते. इशान्येकडील मनिपूर च्या कोहिमा भागातून भारतात घूसायचे आणि भारत काबिज करुन इंग्रजांना भारतातून हाकलून लावायचे असा प्लान आखण्यात आला होता. ठरलेल्या नियोजनानुसार सगळं काही नीट चालंले होते. ब्रिटीशांची काही विमंनतळं आझादहिंदच्या सैन्याने काबिज केली होती. नेताजींच्या नेतृत्वाखाली आझादहिंद फौजेची सुरु असलेली जोरदार कारवाई पाहून इंग्रजांची अक्षरश: झोप उडाली होती. परंतू अशातच एक अनर्थ घडला.

१६ आॅगस्ट १९४५ रोजी नेताजींनी आझाद हिंद फौजेची ची बैठक बोलावली होती. युद्धजन्य परिस्थितीमुळे वातावरण गरम होते. अशात कधी काय होईल याचा भरवसा नव्हता. म्हणुन आपल्या पश्चात जनरल कियानी यांनी आझादहिंद सरकारचे काम पहावे असे नेताजींनी या बैठकीत सुचवले होते. ही बैठक आवरुन नेताजी १७ आॅगस्ट ला सिंगापूरहून बँकाॅक कडे आणि नंतर तेथून सायगावला जाण्याकरता निघाले. नेताजींसोबत हबीब उर रेहमान हे ही होते. मात्र वाटेत १८ आॅगस्ट १९४५ रोजी तैहाकू येथे नेताजींच्या विमानाचा अपघात झाल्याचे वृत्त आले.

नेताजींचा मृत्यु विमान अपघातात झाला की त्यांना ब्रिटिशांनी बंदी बनवून जेल मधे ठेवले होते यावर अनेक वाद उभे आहेत. नेताजींचे नेमके काय झाले याचे स्पष्टीकरण अजून समोर आलेले नाही.

टीम, HELLO महाराष्ट्र

Leave a Comment