हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरोधात देशव्यापी कारवाईनंतर पुण्यात या संघटनेच्या काही समर्थकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मनसेने आज पुण्यातील अलका टॉकीज चौकात आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने मनसेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाचे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले होते.
यावेळी वंदे मातरम… हिंदुस्थान जिंदाबाद… पाकिस्तान मुर्दाबाद अशी घोषणाबाजी मसने कार्यकर्त्यांकडून देण्यात आली. तर काहीं जणांनी पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर जाळून संताप व्यक्त केला. तसेच पीएफआय विरोधी घोषणाबाजीही मनसेकडून करण्यात आली .मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरल्याने पोलीस प्रशासनांचीही चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून आले.
हिंदुस्थान जिंदाबाद !
‘पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा आमच्या पुण्यात दिल्या जाणार असतील तर… आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देशद्रोह्यांविरोधात पुण्यात तीव्र निदर्शनं ! pic.twitter.com/l3mrs2zC02
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 25, 2022
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच या प्रकरणावरून ट्विट करत आपला संताप व्यक्त केला होता. पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे, असं राज ठाकरेंनी म्हंटल. देशद्रोह्यांचं समर्थन करत जर या पीएफआयच्या कार्यकार्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल,तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा, ही थेरं आमच्या देशात चालणार नाहीत, असं ठाकरेंनी ठणकावलं.