सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी चालते पण मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारता; राज ठाकरेंचा घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnriman Sena)  ‘मराठीत करा स्वाक्षरी’ ही मोहिम सुरू केली होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरीही मनसे आणि राज ठाकरेंनी हा कार्यक्रम केला. हा कार्यक्रम शिवाजी पार्क येथे पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी मराठीत स्वाक्षरी केली.

यावेळी राज ठाकरे म्हणाले, सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी होते ते चालतं पण शिवजंयती आणि मराठी भाषा दिनाच्या दिवसाला परवानगी नाकारता, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विचारला आहे. तसेच कोरोनाची एवढी भीती वाटते तर मग निवडणुका पुढे ढकला? असा सल्ला देखील राज ठाकरेंनी यांनी दिला आहे.

तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पत्रकारांनी आपण मास्क का घालत नाही? असा सवाल विचारला त्यावर राज ठाकरे म्हणाले,’मी मास्क कधीच घालत नाही. तुम्ही पण नका घालू’, असा सल्ला पत्रकारांना दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment