हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोना, लॉकडाउन आणि दहीहंडी सणासाठी घातलेले निर्बंध यावरून राज्यातील ठाकरे सरकार वर सडकून टीका केली आहे. कोणतीही गोष्ट होऊ नये म्हणून पहिली, दुसरी तिसरी लाट मुद्दाम आणली जात आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
सध्या तुम्हाला कुठेही बघितल्यावर कोरोनाचा प्रभाव जाणवत आहे का? मग उगाच इमारती सील करण्याचा किंवा सणांवर निर्बंध लादण्याची गरज नाही. त्यामुळे राज्यात सण साजरे करण्यास आणि मंदिरे उघडण्यास परवानगी दिलीच पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. सरकारने लवकरच मंदिरे उघडी न केल्यास आम्ही मंदिराबाहेर घंटानाद करू, असा इशाराही राज यांनी दिला आहे.
जनआशीर्वाद यात्रा चालते. पण सण साजरं करायला बंदी. कोरोना काय फक्त सणांमध्ये पसरतो का? राजकीय यात्रांमध्ये कोरोना होत नाही का? तिथं भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात प्रवेश करुन अभिषेक केला. केली मग सत्ताधाऱ्यांसाठी नियम वेगळे आहेत का? आम्ही दहीहंडी फोडायची नाही का?”
केंद्र सरकारने राज्य सरकारला सणांमध्ये निर्बंध लावण्याच्या सूचना केल्या आहेत असा प्रश्न विचारला असता राज ठाकरेंनी यावर उत्तर दिलं. हे फक्त महाराष्ट्रात, मुंबईत का? बाकीच्या राज्यांच काय? जन आशीर्वाद यात्रा झालेली चालली. सण आला की लॉकडाऊन. म्हणजे सणांमधून रोगराई पसरते. यांच्या यात्रे, मेळाव्यांमधून नाही.