हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपले आहे. गेल्या २ दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत असून आत्तापर्यंत पावसाने अनेक जीव घेतलेले आहेत. मुंबईतील वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 30 जणांचे बळी घेतले. एकूण 11 ठिकाणी घरे, घरांच्या भिंती, दरड किंवा संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. या घटनेनंतर विरोधकांनाही सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून विरोधकांनाच खडेबोल सुनावल्यानंतर मनसेने शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.
यावरून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. ‘जसा बेस्ट “शी.एम” चा सर्वे केला तसा बेस्ट महापालिकेचा सर्वे केला तर त्याच्यात सुद्धा मुंबई महापालिका पहिली येईल.मुंबईकरांची एव्हढी वाट लावून ही महापालिका पहिली कशी हा लोकांना प्रश्न पडेल पण सामना मध्ये हेडलाईन येईल “आमचीच लाल आमचीच लाल” ‘ असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.
जसा बेस्ट "शी.एम" चा सर्वे केला तसा बेस्ट महापालिकेचा सर्वे केला तर त्याच्यात सुद्धा मुंबई महापालिका पहिली येईल.मुंबईकरांची एव्हढी वाट लावून ही महापालिका पहिली कशी हा लोकांना प्रश्न पडेल पण सामना मध्ये हेडलाईन येईल"आमचीच लाल आमचीच लाल"
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 19, 2021
सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल –
पावसाळ्यापूर्वी आणि प्रत्यक्ष मुसळधार पाऊस कोसळतो तेव्हा प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेतली जात असते. तरीही कधीकधी ‘अनैसर्गिक’ पावसाचा ‘दगाफटका’ होतो. १७ जुलैच्या मध्यरात्री मुंबईत दुर्घटनांची ‘दरड’ कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळेच. मुंबईत पावसाने काही झाले की मुंबई महापालिकेच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांनीही हे लक्षात घेतले पाहिजे”, असं म्हणत शिवसेनेनं विरोधकांना खडेबोल सुनावले.