‘त्या’ सॅनिटरी पॅडवरून आदित्य ठाकरेंवर मनसेची जोरदार टीका

0
32
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोना संकटाच्या काळात वेगवेगळ्या पातळीवर गरजू नागरिकांना जीवनाश्यक वस्तूंच वाटप करत मदत केली जात आहे. शिवसेनेकडूनही मुंबईत गरजूंना वस्तूंचं वाटप करण्यात येत आहे. मात्र, वस्तूंचं वाटप करतांना शिवसेनवर आता एका गोष्टींवरून टीकेचा भडीमार होत आहे. कुलाबा विधानसभा मतदारसंघातील एका परिसरात शिवसेनेकडून महिलांसाठी सॅनिटरी पॅड्सचं वाटप करण्यात आलं. जवळपास ५०० सॅनिटरी पॅड्सची पाकिट सदर परिसरात वाटण्यात आली. या सॅनिटरी पॅड्सच्या पाकिटावर आदित्य ठाकरेंचा फोटो लावण्यात आला होता. यावरूनच आता शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका होत आहे. मनसेच्या संदीप देशपांडेंनी कोरोना संकटाच्या परिस्थितीतही शिवसेना जाहिरातबाजी करत असल्याची सडकून टीका केली आहे.

मनसेचे संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करून ‘कशावर कोणाचा फोटो टाकायचा हे कळत नाही ?आता म्हणतील राजकारण नको. आधीच फोटो छापले होते का?’ असा सवाल ट्विटरच्या माध्यमातूनशिवसेनेला केला आहे. सध्या मुंबईत कोरोनाचा कहर जास्त आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणं सील करण्यात आली आहेत. महिलांना कंन्टेन्मेंट झोनमधून बाहेर पडणं कठीण आहे. म्हणून अनेक संस्था, राजकीय पक्ष पुढे येऊन मदत करत आहेत. मात्र ही मदत करत असताना राजकीय पक्ष मदत केल्याची जाहिरात करताना दिसत आहेत. दरम्यान, मदत म्हणून वाटल्या गेलेल्या सॅनिटरी पॅड्सच्या पाकिटावर आदित्य ठाकरेंचा फोटो झळकल्यानं त्यांच्यावर आता टीका होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here