ज्यांची अक्कल गुडघ्यात आहे त्यांनी….; मनसेचा संजय राऊतांवर पलटवार

0
72
Raj Thackeray sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर टीका केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांची अक्कल काढली होती. यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांवर पलटवार करत ज्यांची अक्कल गुडघ्यात आहे त्यांनी दाढेवर बोलू नये असा टोला लगावला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, ज्यांची अक्कल गुडघ्यात आहे त्यांनी अक्कल दाढेवर बोलू नये. सध्या संजय राऊत बिझी आहेत. अनेक जमिनी अलिबागमध्ये आहेत. त्यांचा हिशोब ईडीला द्यायचाय. हजारो कोटी मनपाचे खाल्ले त्याचा हिशोब त्यांना द्यायचाय आणि राज साहेब जे काल बोलले ते झोंबलेलं दिसतंय. संजय राऊतांचा भोंगा तर रोज सकाळी ९ वाजता वाजतोच. त्यांना काय एवढं महत्व द्यायचं? सध्या त्यांची मानसिक स्थिती पण नीट नाही. असं संदीप देशपांडे म्हणाले.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानंतर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना फटकारले होते. भाजप आणि शिवसेनेत काय झालं ते आम्ही पाहू. तिसऱ्या व्यक्तीची गरज नाही आत यायची. आम्ही आमचं पाहून घेऊ. तुम्ही तुमचं पाहा, तुम्हाला एवढं उशिरा कसं आठवलं? अक्कल दाढ एवढी उशिरा कशी येते? याचा अभ्यास करावा लागेल. काल शिवाजी पार्कात भाजपचाच भोंगा सुरू होता. भाजपचीच स्क्रिप्ट होती. भाजप त्यांची मळमळ दुसऱ्यांच्या भोंग्यातून बाहेर काढत आहेत असे राऊतांनी म्हंटल होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here