हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांच्या (Ajit Pawar) गटाला दिले. ज्याप्रमाणे शिवसेना संबंधित निकाल देण्यात आला त्याचप्रमाणे आमदार आणि खासदारांचे संख्याबळ पाहून निवडणूक आयोगाने अजितदादांच्या हातात राष्ट्रवादीची सूत्रे दिली. या निकालानंतर अजित पवारांच्या गोटात आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे मनसेने अजित पवारांचा एक जुना विडिओ शेअर करत डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ शिंदेनी जेव्हा शिवसेनेवर दावा केला होता, त्यावेळी अजित पवारांनी त्यांच्यावर टीका करत तुमच्यात धमक होती तर काढा ना नवा पक्ष, कोणी अडवलं होते? असा सवाल केला होता. हाच विडिओ शेअर करत मनसेने (MNS Shared Ajit Pawar Video) अजित पवारांना आरसा दाखवला आहे.
अजितदादांच्या व्हिडिओत नेमकं काय?
या विडिओ मध्ये आपण पाहू शकता कि, जेव्हा निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे याना दिले त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या अजितदादांनी शिंदेंवर जोरदार निशाणा साधला होता. ज्या उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी शिवसेना पक्ष स्थापन केला, वाढवला.. महाराष्ट्राच्या सर्वदूर पसरवला त्यांचाच पक्ष काढून घेतला, चिन्ह काढून घेतलं ….. हे जरी निवडणूक आयोगाने दिले असलं तरी जनतेला पटलेलं नाही, तुमच्यात जर धमक होती तर काढायचा ना नवा पक्ष, कोणी अडवलं होत तुम्हाला? असा उलट सवाल अजित पवारांनी त्यावेळी केला होता. मात्र आता त्याच अजित पवारांनी आपलीच राष्ट्रवादी असा दावा केल्याने मनसेने अजित पवारांवर टीका केली आहे. या विडिओ सोबत मनसेने कॅप्शन सुद्धा दिले आहे. ‘भुजां’मध्ये कितीही ‘बळ’ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे ‘तट’ फोडून सत्तेसाठी घातलेला हा ‘वळसा’ महाराष्ट्राला ‘पटेल’ का? वाह रे पट्ठ्या…! 🤨 असं या कॅप्शन मध्ये म्हंटल आहे.
‘भुजां’मध्ये कितीही ‘बळ’ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे ‘तट’ फोडून सत्तेसाठी घातलेला हा ‘वळसा’ महाराष्ट्राला ‘पटेल’ का?
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 7, 2024
वाह रे पट्ठ्या…! 🤨 pic.twitter.com/ZXcOk6y6oy
दरम्यान, मनसेने अजून एक ट्विट करत अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसाकवणं सोप्प आहे. पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी ‘राज ठाकरे’ यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते..असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ!’ असे ट्विट करत मनसेने अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.