हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेस समोरासमोर आले असून औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडलेली आहे. त्यातच आता नामांतराच्या या वादात आता मनसेनेही उडी घेतली आहे. अग्रलेख काय लिहित बसलाय, नामांतर करायचं तर लवकर करा, असा सल्ला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यातील सत्ताधारी शिवसेनेला दिला आहे.
अग्रलेख लिहीत बसण्यापेक्षा औरंगाबादचं नामांतर करायचं तर लवकर करा. तसेच २६ जानेवारीपर्यंत औरंगाबादचं संभाजीनगर अस नामांतर करा, तसे न झाल्यास तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असे अल्टिमेटम मनसेकडून देण्यात आले आहे. आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. त्यामुळे ते केवळ अग्रलेख लिहीत आहेत. त्यांना कृती करणे जमत नाही, असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला.
औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध – बाळासाहेब थोरात
दरम्यान, औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध असून आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे असे बाळासाहेब थोरातांनी ठामपणे सांगितंल आहे.