अंधेरीच्या मतदानात नोटांचा पाऊस…. ;वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत

vasant more
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. ऋतुजा लटके याना 66 हजार 247 मते मिळाली आहेत. मात्र या निवडणुकीत नोटाला सुद्धा तब्बल 12 हजार 776 मते मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील मनसे नेते यांची फेसबुक पोस्ट जोरदार चर्चेत आली आहे.

वसंत मोरे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये “मी नाही खाणार आणि तुला पण नाय खाऊ देणार… अंधेरीच्या मतदानात नोटांचा पाऊस लोकशाही प्रधान देशात अवघड आहे” असं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी andherielection हा हॅशटॅग देखील वापरला आहे. यावर अनेक जणांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

 vasant more facebook post

दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यांनंतर ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला होता. मात्र या पोटनिवडणुकीत फक्त ३१ टक्के मतदान झाल. तरीही ऋतुजा लटके याना 66 हजार 247 मते मिळाली. मात्र नोटांना मिळालेल्या मतांनीही महाराष्ट्राचे लक्ष्य वेधलं. विशेष म्हणजे लटके यांच्या विरोधात नोटांचं बटन दाबण्याचा प्रचार विरोधकांकडून सुरु आहे असा आरोप ठाकरे गटाकडून यापूर्वीच करण्यात आला होता. आजही आपल्या विजयानंतर ऋतुजा लटके यांनी नोटावरून भाजपवर निशाणा साधला. नोटाला झालेलं मतदान हे भाजपलाच मिळालेली मतं आहेत. त्यांच्या मनात सहानुभूतीची भावना असती तर त्यांनी आधीच उमेदवार जाहीर केला नसता”, असा टोला त्यांनी लगावला.