नवी दिल्ली | असहिष्णतेचा मुद्दा पुन्हा एकदा देशात डोके वर काढणार असल्याचे चित्र सध्या माध्यमातून पुढे येते आहे. अशातच ४९ सेलिब्रिटींनी नरेंद्र मोदी यांना मॉब लिंचिंग आणि जय श्रीरामच्या मुद्द्यांवर पत्र लिहले आहे. त्यामुळे हा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. यावर नरेंद्र मोदी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनुराग कश्यप, श्याम बेनेगल, रामचंद्र गुहा, शुभा मुद्गल, अपर्णा सेन अशा ४९ सेलिब्रिटींनी मोदींना पत्र लिहून मॉब लिंचिंग आणि जय श्रीरामाच्या नावावर लोकांवर होणाऱ्या हल्ल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याबद्दल कडक पाऊले आवश्यकता असल्याचे देखील या सेलिब्रेटींनी म्हणले आहे.
देशात मॉब लिंचिंगच्या मुद्द्याने डोके वर काढले आहे. यावर आपण संसदेत बोलला आहेत. मात्र तेवढ्यावर भागणार नाही. यावर कडक कायदे करण्याची आवश्यकत आहे त्यामुळे आपण यात जातीने लक्ष घालावे असे नरेंद्र मोदी यांना सेलिब्रिटींना म्हणले आहे. जय श्रीरामाच्या घोषणेवरून देशात संघर्ष उफाळून येतो आहे. लोकांना त्यांच्याच देशात राष्ट्रविरोधी म्हणले जाते आहे तसेच त्यांच्यावर शहरी नक्षली असल्याचे ठपके ठेवले जात आहेत. सरकाराच्या विरोधात बोलणे देशद्रोह मानला जातो असे या पत्रामध्ये लिहण्यात आले आहे.
हे पण वाचा –
मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणाऱ्या विनोद पाटलांना हा पक्ष बनवणार आमदार
लक्ष्मण मानेंनी केली नव्या राजकीय पक्षाची घोषणा ; काँग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत
या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणूक लढणार !
आणि रोहित पवारांनी त्याच्या हट्टापायी सलूनमध्ये केली कटींग!
म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-वडिलांचा फोटो
ना मंत्रीपद, ना राज्यपाल पद , विजयसिंहांना मिळणार ‘या’ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी?
अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट