नाशिक प्रतिनिधी | आदित्य ठाकरे यांनी पुन्हा सत्ता संपादन करण्यासाठी महाराष्ट्र्भर विजय संकल्प यात्रा आरंभली आहे. या यात्रेत चोरांचीच चलती असल्याचे निदर्शनाला आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नाशिक येथील सत्ता संपादन मेळाव्यात आदित्य ठाकरे यांच्या भाषणाच्या दरम्यान तल्लीन झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचे मोबाईल आणि रोखड लंपास करण्यात आली.
आदित्य ठाकरे यांच्या यात्रेत चोरांची टोळी सक्रिय झाली असल्याचे बोलले जाते आहे. या वृत्तास पोलिसांनी देखील दुजोरा दिला आहे. तसेच नाशिक मध्ये भर सभेत घडलेल्या चोरीच्या प्रकाराबद्दल दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालनाने पोलीस कोठडीत पाठवले आहे. बिलाल खान आणि विठ्ठल जाधव असे या दोन चोरांची नवे आहेत. बिलाल खान हा मालेगावचा रहिवाशी आहे. तर विठ्ठल जाधव हा बीड येथील रहिवाशी आहे.
आदित्य ठाकरे यांचे मेळाव्यात भाषण सुरु असतानाच नगरसेवक दिलीप दातीर यांच्या खिशातील पाकिटाला चोराने हात घातला तेव्हा त्यांनी त्याला रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर देखील चार पदाधिकाऱ्यानी मोबाईल आणि रोखड चोरीला गेल्याचे म्हणले मात्र रामदास अहिर यांनीच फक्त २६ हजार रुपये चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात दिली आहे.