नवी दिल्ली । देशात डिझल-पेट्रोलच्या वाढत्या दरांमुळं आधीच जनता त्रस्त असताना आता आणखी एका गोष्टींमुळं त्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. टेलिकॉम कंपन्या पुढील एक किंवा दोन तिमाहीत आपल्या टॅरिफमध्ये वाढ करण्याच्या तयारी आहेत. त्यामुळं मोबाईल डेटा, कॉलिंग महागणार आहे. गुंतवणुकीसंबंधी माहिती देणारी कंपनी ICRA च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. आगामी १ एप्रिल पासून सुरू होणारं आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये आपला महसून वाढवण्यासाठी टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा दरवाढीचं पाऊल उचलण्याची शक्यता आहे.
एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांचं 2G मधून 4G मध्ये अपग्रेडेशन होत असल्या कारणानं दरवाढीमधून एवरेज रेवेन्यू पर युझरमध्ये सुधारणा होऊ शकते, असं ICRA नं म्हटलं आहे. मीडियम टर्ममध्ये हे जवळपास २२० रूपये होऊ शकतं. ज्यामुळे पुढील दोन वर्षांमध्ये या क्षेत्राचा महसूल ११ ते १३ टक्के आणि आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ऑपरेटिंग मार्जिन जवळपास ३८ टक्के वाढेल, असंही सांगण्यात आलं आहे.
ICRA च्या म्हणण्यानुसार कॅश फ्लो जनरेशनमध्येही सुधारणा होणार असून भांडवली खर्चांमध्येही घट झाल्यामुळे बाहेरून कर्ज घेण्याची आवश्यकता कमी भासेल. परंतु एजीआरची रक्कम देण्याव्यतिरिक्त कर्ज आणि पुढील स्पेक्ट्रमच्या लिलावाकडे पाहता टेलिकॉम कंपन्यांवर दबाव कायम राहणार असल्याचं म्हटलं जात आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.