हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल लहान मुलं ग्राउंड किंवा मैदानात खेळताना दिसत नाहीत तर मोबाईल घेऊन गेम खेळताना जास्त दिसतात. टाइमपास किंवा बोर झाल्यास पूर्वी खेळ खेळण्यासाठी मुलं मैदानात, सोसायटीच्या गार्डनमध्ये जाऊन खेळत असत. पण आता चित्र बदलल्याचं दिसतंय. बोर झालं की आज-काल मुलं स्मार्टफोन घेऊन आपला वेळ घालवतात. त्यामुळे त्यांना स्मार्टफोन वापरण्याची प्रचंड सवय होते. एवढेच नाही तर लहान मुलं रडत असताना आई वडील त्यांना शांत करण्यासाठी मोबाईल फोन देतात जेणेकरून शांत बसतील. परंतु हे अत्यंत चुकीचं असून मोबाईल फोनच्या जास्त वापरामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम दिसून येतो.
स्मार्टफोनचा जास्त वापर झाल्यामुळे लहान मुलांमध्ये ऑटिज्म नावाचा खतरनाक रोग दिसून येत आहे. मोबाईल फोन जास्त वापर केल्यामुळे मुलांच्या मानसिक विकासावर परिणाम दिसून येतो. याला वर्चुअल ऑटिज्म म्हटले जाते. हा रोग पाच ते आठ वर्षांमधील मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. एका रिपोर्टनुसार गॅजेट्स, मोबाईल फोन आणि टीव्ही जास्त बघितल्यामुळे मुलांच्या भविष्यावर त्याचा परिणाम दिसू शकतो.
वर्चुअल ऑटिझम म्हणजे काय?
वर्चुअल ऑटिझम म्हणजे एक मानसिक आजार असून त्याची लक्षणे साधारणपणे 4 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये दिसून येतात. हा रोग मोबाईल फोन, टीव्ही, कम्प्युटर यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर केल्यामुळे होतो. आणि नकळत त्याचे व्यसन लागते. जास्त वेळ स्मार्टफोन मध्ये वेळ गुंतवल्यामुळे संवाद स्किल कमी होतात. आणि सोसायटीमधील मुलांसोबत किंवा लोकांसमोर बोलताना संवादात अडचण निर्माण होते. एका अभ्यासानुसार,जे एखादा मुलगा वर्चुअल ऑटिझम पीडित असेल तर तो बोलताना अडखळतो. त्याचबरोबर त्याची आयक्यू लेव्हल सुद्धा कमी होऊ शकते. इतर कोणासोबतही बोलताना तो घाबरतो आणि त्याला काही काम सांगितल्यास कामाचा व्यवस्थित रिस्पॉन्स तुम्हाला मिळत नाही.
दुसरीकडे बऱ्याच घरात अनेक लहान मुले मोबाईल हातात घेतल्याशिवाय जेवण करत नाही. आणि त्याचा हट्ट पुरवण्यासाठी पालकही लगेच हातात मोबाईल देतात. हे लक्षण अत्यंत गंभीर असून लहान मुलांना जेवण करताना मोबाईल दिल्यामुळे जेवणावर लक्ष केंद्रित होत नाही. त्याचबरोबर याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर देखील होतो. अशावेळी आई-वडिलांनी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अचानकच मुलांना मोबाईल पासून दूर न करता मुलांसाठी मोबाईल वापरण्याचा एक वेळ निवडा. तसेच ठराविक वेळेतच त्यांना मोबाईल द्या. मोबाईल ऐवजी मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करणे देखील आईवडिलांचे काम आहे. त्याचबरोबर लहान मुलांना मोबाईल मुळे होणारे नुकसान हे समजून सांगने अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर मुलांसोबत संवाद साधने देखील गरजेचे आहे..