रॉ एजंट रवींद्र कौशिक आणि एका पाकिस्तानी मुलीची प्रेमकथा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षांत हिंदी सिनेसृष्टीतून प्रदर्शित झालेल्या राझी ह्या चित्रपटातून एका भारतीय गुप्तहेराची कथा आपणा समोर आली, व्यक्तीगत नात्यांपेक्षा देशाप्रती असलेल्या प्रेमाची कथा मनाला अधिक भावणारी होती. भारतात ‘ब्लॅक टायगर’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या ‘रवींद्र कौशिक’ यांची कहाणी काही याच सारखी आहे. भारतीय गुप्तहेर खात्यातील हुकमाचा एक्का, आपले बुद्धीचातुर्य आणि अभिनयाच्या जोरावर अगणित जीव वाचविणाऱ्या रवींद्र कौशिक यांचा जन्म श्रीगंगानगर राजस्थान येथे ११ एप्रिल १९५२ रोजी झाला. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या मुलावर RAWची पडलेली नजर त्याच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी देऊन जाते. केवळ २३ वर्षांच्या कौशिकची RAW मध्ये भरती होते आणि हा कोवळा भारतीय गुप्तहेर नाबी अहमद शकीर म्हणून पाकिस्तान मध्ये पाठवला जातो.

सामान्य पाकिस्तानी नागरिकाचे जीवन जगण्यासाठी कौशिकला उर्दू भाषेचे शिक्षण, मुस्लिमांनी धार्मिक ग्रंथांचे ज्ञान तसेच पाकिस्तानच्या कोपऱ्यांची खडान् खडा माहिती देऊन तयार केले जाते. यानंतर सर्वात मोठी जबाबदारी असते ती नागरिकांचा विश्वास संपादन करण्याची, जेणेकरून पाकिस्तानची रणनीती भारतीय सेनेला कळवता येईल. यासाठी कौशिकने कराची विद्यापीठातून एलएलबी ची पदवी मिळवली, व काही काळातच पाकिस्तानच्या सेनेत भरती झाला. पाकिस्तानच्या सेनेत रुजू होणे हे धेयाप्रती एक महत्त्वाचे पाऊल म्हटले पाहिजे. केवळ सैन्यात भरती न होता कौशिकने पाकिस्तानी सैन्यात मेजरची पदवी मिळवली.

पाकिस्तानी म्हणून आपले ध्येय गाठता अमानत नावाच्या मुलीसोबत कौशिकची मैत्री होते, मैत्रीचे रूपांतर प्रेमात होताच त्यांची लग्नगाठ बांधली जाते. लग्नानंतर अमानतला आपल्या ध्येयापासून कौशिकने नेहमीच वंचित ठेवले. अरिब अहमद खान हे त्यांच्या मुलाचे नाव आहे. पाकिस्तानी कुटनीती संदर्भात महत्त्वाची माहिती भारतात पोहोचवत तो ब्लॅक टायगर या नावाने १९७८-१९८३ मध्ये कार्यरत होता. भारतीय गुप्तहेरच्या तोंडून चौकशीच्या दरम्यान कौशिक बद्दलची माहिती पाकिस्तानी सेनेसमोर येते, यामुळेच एवढी वर्षे शिताफीने वावरणाऱ्या कौशिकला तत्काळ अटक केली जाते. दोन वर्ष सलग पाकिस्तानच्या कैदेत अमानुष छळ सहन केल्यानंतर भारताचा ब्लॅक टायगर यांनी देह ठेवला.

असे म्हणतात की पाकिस्तानाच्या कैदेतून कौशिकनी भारतात असलेल्या परिवाराशी पत्रव्यवहार करण्याचा प्रयत्न केला. पण सरकारने यांच्या अस्तित्वाची माहिती पूर्णपणे नष्ट केल्यामुळे ओळख पटवून घेण्यास नकार देण्यात आला.‌कौशिक यांच्या देहावसनानंतर पत्नी व मुलाबद्दल माहिती उपलब्ध नाही.