मोबाईल युजर्ससाठी महत्त्वाची बातमी !! येत्या 15 एप्रिलपासून ही सेवा होणार बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. येत्या 15 एप्रिलपासून
यूएसएसडी-आधारित कॉल फॉरवर्डिंग ही सेवा बंद राहणार आहे. याबाबतचे आदेश दूरसंचार विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत ग्राहकांना कॉल फॉरवर्डिंगसाठी दुसरा पर्याय दिला जाणार आहे. सध्याच्या घडीला मोबाईल ग्राहक कोणत्याही ऍक्टिव्ह कोडवरून यूएसएसडी सेवा वापरत आहेत. त्यामुळे फसवणूक आणि ऑनलाईन गुन्हे देखील घडत आहेत. या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठीच ही सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

दूरसंचार विभागाने 28 मार्च रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, एसएसडी आधारित कॉल फॉरवर्डिंग सुविधा काही अयोग्य कारणांसाठी वापरण्यात येत असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळेच 15 मार्चपासून पुढील सूचना येईपर्यंत
यूएसएसडी आधारित कॉल फॉरवर्डिंग सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. तोपर्यंत सर्व मोबाईल ग्राहकांसाठी दुसरा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल. परंतु तोपर्यंत कोणत्याही ग्राहकाला कॉल फॉरवर्डिंग सेवेचा लाभ घेता येणार नाही.

दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण जगभरात मोबाईल फोनचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक गैरप्रकार घडण्याची संख्याही वाढली आहे. सध्या फेक नंबर वरून कॉल करून त्रास देणे फसवणूक करणे अशा घटना घडताना दिसत आहेत. या सर्व घटनांवर आळा घालण्यासाठी दूरसंचार विभाग सर्व पातळीवर प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दूरसंचार विभागाने कॉल फॉरवर्डिंग ही सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.