UGC NET PhD Entrance Exam 2024 | P.hD प्रवेशासाठी NET स्कोअर महत्वाचा, इतर कोणतीही परीक्षा देणे गरजेचे नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

UGC NET PhD Entrance Exam 2024 | विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच UGC ने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. या घेतलेल्या निर्णयानुसार UGC ने आता जाहीर केले आहे की, 2024- 25 या शैक्षणिक वर्षासाठी पीएचडीसाठी ज्यांना प्रवेश करायचा आहे. त्यांच्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेचे म्हणजेच NET परीक्षेचे गुण महत्त्वाचे असणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक 2020 नुसार UGC ने हा निर्णय घेतलेला आहे. विद्यापीठे त्यांच्या वेगवेगळ्या पीएचडी (UGC NET PhD Entrance Exam 2024) कार्यक्रमाच्या परीक्षेसाठी प्रवेश घेत असतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागत होत्या.

शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून NET स्कोरची गरज

NETही परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. ही परीक्षा जून आणि डिसेंबरमध्ये घेतली जाते. ज्युनियर रिसर्च फेलोशिप यांच्या स्कोरच्या आधारे ही परीक्षा दिली जाते. त्याचबरोबर पदवीत्तर आणि पदवी असलेल्या लोकांसाठी सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठी पात्र होण्यासाठी NET परीक्षा खूप गरजेची आहे. UGC ने म्हटले आहे की, शैक्षणिक वर्ष 2024- 25 पासून पीएचडी प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता चाचणी म्हणजे NET स्कोर देखील खूप गरजेचा आहे. त्यासाठी विद्यापीठाने उच्च शिक्षण संस्थांना स्वतंत्र प्रवेश परीक्षा द्यावी लागणार नाही.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिकारी यांनी म्हटल्याप्रमाणे UGC ने परीक्षेच्या तरतुदींचा आढावा घेण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन केली होती. यावेळी पॅनलच्या शिफारशीच्या आधारे 2024- 25 पासून पीएचडीच्या परीक्षेसाठी NET स्कोर गरजेचा असणार आहे. असा निर्णय घेण्यात आलेला आहे. यावेळी UGC चे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी सांगितले की, वर्षातून दोनदा ही परीक्षा आयोजित केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्षातून दोन वेळा ही परीक्षा देऊ शकतात विद्यापीठे विद्यार्थ्यांना अधिक लवचिकता प्रदान करू शकतात.

परीक्षा व्यवस्थापन आणि खर्चाचा बोजा कमी होणार | UGC NET PhD Entrance Exam 2024

यूजीसी अध्यक्षांचे असे म्हणणे आहे की, विद्यार्थ्यांना विविध विद्यापीठाद्वारे घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी यामुळे दिलासा मिळणार आहे. असे केल्याने व्यवस्थापनाचा भार आणि वारंवार परीक्षांचा खर्च देखील कमी होणार आहे. आम्ही विद्यापीठांना 2024,25 शैक्षणिक क्षेत्रापासून सुरू होणाऱ्या पीएचडी प्रवेशासाठी NET परीक्षेतील गुण स्वीकारण्यास जोरदार प्रोत्साहन देणार आहोत असे देखील त्यांनी सांगितले.