रोशनगेट परिसरातील मोबाइल शॉपी फोडली;१२ हजारांची रोकड पळविणाऱ्या दोघांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद रोशनगेट परिसरातील मोबाइल शॉपीचे शटर उचकटून गल्ल्यातील १२ हजारांची रोकड पळविणाºया दोन चोरट्यांना जिन्सी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.सय्यद अली सय्यद मंतू (वय २६, रा. शरीफ कॉलनी) आणि शेख इमरान शेख लुकमान (३५, रा. बाबर कॉलनी) अशी चोरट्यांची नावे आहेत.

मोहम्मद इम्तियाज मोहम्मद सिद्दीकी (रा. इंदिरानगर, बायजीपुरा) यांची रोशन गेट येथे मोबाइल शॉपी आहे. मंगळवारी (दि. १६) रात्री दुकान बंद करून ते घरी गेले. यानंतर चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानाच्या गल्ल्यातील रोख १२ हजार रुपये चोरून ते पसार झाले. दुसºया दिवशी सकाळी मोहम्मद यांना दुकानाचे शटर अर्धवट उघडे दिसले. त्यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विजय जाधव, कर्मचारी अयुब पठाण, संपत राठोड, संजय गावंडे, संतोष बमनावत यांच्या पथकाने तपास केला असता दोन्ही आरोपी घटनास्थळाजवळील एका सीसीटीव्ही कॅमेयात कैद झाल्याचे आढळून आले. यानंतर रात्री दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group