हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एखाद्याच्या भेटीनंतर त्याच्यावर होणाऱ्या अन्यायावर पांघरून घालणारे नेते नाहीत; तर एकमेकांचा हिशोब चुकता करण हा त्यांचा इतिहास आहे, असं मत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी आता सुरु झाली आहे. भाजपकडून समाधान औताडे तर राष्ट्रवादीकडून भारत भालकेंचे पुत्र भगीरथ भालके यांना मैदानात उतरवण्यात आलंय. शिवसेनेच्या बंडखोर शैला गोडसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील अशी लढत होणार असल्याची चिन्हे आहे दिसत आहे. या मतदार संघाकडे भाजपनेही विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. मंगळवारी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचे अधिकृत उमेदवार समाधान औताडे यांच्या प्रचाराला शुभारंभ झाला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तेथील निवडणुकीतील वातावरणाची माहिती घेतली.
यावेळी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले, ‘ राज्यात अलीकडे राजकारणात मोठा बदल झालेला आहे. ठाकरे सरकार आल्यापासून राजकारणाच गुन्हेगारीकरणं झालं आहे. आणि हेच गुन्हेगारीकरण लोकांच्यासमोर आणण्यासाठी येनाऱ्या काळात राज्यात किमान वीस हजार सभा पन्नास लोकांच्या उपस्थितीत घेतल्या जाणार आहेत, असेही भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.