अजितदादा, तो माईचा लाल आवताडेंच्या रूपाने महाराष्ट्राला मिळालाय ; पडळकरांनी पुन्हा डिवचले

ajitdada padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने ही निवडणूक एकत्र लढवली असताना देखील भाजपने इथे बाजी मारल्यामुळे महाविकास आघाडी साठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान भाजपच्या विजयानंतर गोपीचंद पडळकर यांनी … Read more

दोन तालुक्यात संवाद साधता न आल्याने पराभव ; जयंत पाटलांची प्रतिक्रिया

Jayant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस साठी अंत्यत प्रतिष्ठेची असलेल्या पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला. भाजपच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा 3733 मतांनी पराभव केला. या पराभवा बद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी चांगली मदत केली. मात्र, … Read more

समाधान अवताडेंचा विजय हा महाविकास आघाडीच्या थोबाडीत मारल्यासारखा – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांचा दणदणीत पराभव केला. यामुळे महाविकास आघाडीत जोरदार धक्का बसला. तिन्ही पक्ष एकत्र येऊन देखील भाजपने बाजी मारल्यानंतर भाजप नेत्यांना उत्साह वाढला आहे. या विजयानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. समाधान आवताडे याचा विजय हा महाविकास … Read more

अजित पवारांचा गर्व मोडून काढला ; पडळकरांची तिखट प्रतिक्रिया

ajitdada padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपने यश मिळवल्या नंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर निशाणा साधला आहे. अजित पवार यांना गर्व झाला होता. त्यांची डगेगिरी भाषा होती. तो गर्व मोडून काढला,” अशी तिखट प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिली. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आज महाविकास आघाडीचा गर्व फोडण्यात … Read more

पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?’

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार समाधान आवताडे यांची विजयाकडे वाटचाल दिसून येत आहे. आवताडे हे सध्या आघाडीवर असून त्यांचा विजय पक्क समजला जात आहे. यापार्श्वभुमीवर भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी एक ट्विट केले आहे. पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?’ असं म्हणत … Read more

राष्ट्रवादी बाजी मारणार की भाजप धक्का देणार?? पहा काय आहे पंढरपूर पोटनिवडणुकीच गणित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाच वातावरण असलं तरी पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि दिवंगत आमदार भारतनाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके आणि भाजप नेते समाधान अवताडे यांच्यात जोरदार लढाई पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी भाजप धक्का देणार का यांकडे सर्वांचे लक्ष आहे. निवडणूक … Read more

ज्यांनी घराघरात भांडणं लावली त्यांच्या घरात आता टोकाची भांडणं ; पडळकरांचा पवारांवर हल्लाबोल

padalkaR sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ज्यांनी राज्याच्या राजकीय घराण्यात भांडणं लावून घरं फोडली त्याच शरद पवारांच्या  घरात आता टोकाची भांडणं सुरु आहेत. मला त्यांना सांगायचंय की नियतीचा न्याय इथेच असतो. मेंढ्यांचं नेतृत्व कधीच लांडग्याकडे नसतं”, अशा शब्दात भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केली. पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारादरम्यान त्यांनी ही टीका … Read more

अजित पवारांनी पाटलांना पुन्हा डिवचलं: म्हणाले, चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केलीय का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंढरपूर विधानसभा पोट निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता. दिवसभरात भाजप आणि राष्ट्रवादी कडून जोरदार प्रचार सभा घेण्यात आल्या. भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणात चिखलफेक केली. पहिल्यांदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना डिवचल. त्यानंतर पाटलांनीही पवारांना खबरदार असा इशारा दिला. एवढं सांगूणही … Read more

पंढरपूर सारख्या पवित्र ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येता कामा नाही – निलेश राणे

nilesh rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिवंगत नेते भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले असून दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली असून त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रचारात उतरले आहेत. याच दरम्यान भाजप नेते निलेश … Read more

फडणवीसांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का? – जयंत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपकडे आता कार्यकर्त्यांची अत्यंत कमतरता आहे. कार्यकर्त्यांना भाजपमध्ये न्याय मिळत नसल्याने अनेकजण महाविकास आघाडीची वाट धरत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का? असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंढरपुरात केला. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभेत ते बोलत होते … Read more