“मोदी एक्सप्रेस” कोकणात गणेश चतुर्थीला भाविकांसाठी मोफत धावणार ट्रेन : नितेश राणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रत्नागिरी | दरवर्षी गणेश गणेश चतुर्थी निमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी बसेस सोडल्या जातात. नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देवून कोकणाला आशिर्वाद दिला आहे. म्हणून देशाचे पंतप्रधान यांचे आभार मानण्यासाठी यावर्षी  मोदी एक्स्प्रेस रेल्वे धावणार आहे. दादर ते सावंतवाडी या मार्गावर धावणार असल्याची घोषणा भाजपा आमदार नितेश राणे यांनी घोषणा केली आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

नितेश राणे म्हणाले की, मोदी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्यांसाठी हा प्रवास मोफत असणार असून त्यासाठी आरक्षण करावं लागणार आहे. नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देऊन नरेंद्र मोदींनी कोकणाला आशीर्वाद दिला आहे, त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी गणेश चतुर्थी साठी मोदी एक्सप्रेस सोडत आहोत.

मोदी एक्सप्रेस ही 1 हजार 800 भाविकांसाठी ही ट्रेन सोडण्यात येणार असून दादरहून कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडीपर्यंत धावणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर 8 वरुन ही ट्रेन सुटणार आहे. प्रवासात एक वेळचं जेवणदेखील दिलं जाणार असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली.

मोदी एक्सप्रेससाठी बुकिंग करणे आवश्यक

गणेश चतुर्थीला येणाऱ्या भाविकांना बुकिंगसाठी प्रवाशांना नितेश राणे मतदारसंघातील मंडळ अध्यक्षांचे क्रमांक दिले आहे. देवगडमधील संतोष किंजवडेकर आणि अमोल तेली, वैभववाडीसाठी नासिरभाई काजी आणि कणकवलीसाठी मिलिंद मिस्त्री आणि संतोष कानडे यांना 27 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान फोन करुन जागा आरक्षित करायची आहे.

Leave a Comment