Tuesday, January 7, 2025

या नंबरवरून कॉल आल्यास सावधान; अन्यथा होईल मोठे आर्थिक नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतामध्ये तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. परंतु या प्रगतशील तंत्रज्ञानाचा जेवढा मानवाला फायदा होत आहे. तेवढाच तोटा देखील होत आहे. कारण आता तंत्रज्ञानाचा वापर करूनच अनेक लोक सायबर गुन्हे करत आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढवताना दिसत आहे. आणि अनेक लोकांचा यामुळे पैसा देखील जात आहे. अनेक वेळा क्राईम करणारे हे लोक लोकांना धमकी देतात की, त्यांनी पैसे पाठवले नाही तर त्यांना डिजिटल अटक होईल. आणि पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून अनेक लोक त्यांना पैसे देखील मिळतात. परंतु आता थेट पंतप्रधान मोदी यांनी अशा फसवणुकीचा बद्दल इशारा दिलेला आहे. तसेच दूर संचार विभागाने देखील काही आंतरराष्ट्रीय फोन कॉल आल्यावर त्यांना कोणतेही उत्तर देऊ नये असे सांगितलेले आहे.

या फोन नंबर पासून सावध रहा

दूरसंचार विभागाने सावध राहण्याचा सल्ला दिलेला आहे. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार +77, +89, +85, +86, +84 या फोन नंबरने सुरुवात होणाऱ्या नंबर पासून सावध राहा. कारण हे नंबर फसवणुकीचे असू शकतात. तसेच जर तुम्हाला अशा नंबर वरून कॉल आला, तर तुम्हाला तक्रार करण्याची देखील सांगितलेले आहे. तुम्ही संचार साथी या पोर्टलवर भेट देऊन तक्रार करू शकता. आणि सरकार हे नंबर पूर्णपणे ब्लॉक करतात. आणि इतर लोकांना देखील तुम्ही वाचू शकता.

माझी काही दिवसापूर्वी एका 25 वर्षे विद्यार्थ्याला कॉल आला होता. ज्यामध्ये सांगितले होते की, तो एका सरकारी एजन्सीचा पोलीस अधिकारी आहे. तसेच त्या व्यक्तीने विद्यार्थ्याला धमकी दिली होती की, त्याच्या फोन नंबर वर तक्रार नोंदवली गेलेली आहे. आणि विशेष सर्टिफिकेट न घेतल्यास त्याचा नंबर ब्लॉक केला जाईल. त्यामुळे त्याने त्याचे सगळे डिटेल्स त्या माणसाला दिले. आणि त्याचे आर्थिक नुकसान झालेल्या आहेत.

भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी सायबर गुन्हेगार यांनी जवळपास 2140 कोटी रुपयांची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या आर्थिक फसवणुकीपासून सावध राहा. आणि कोणताही अनोळखी नंबर वरून फोन आला तर त्याला उत्तर देऊ नका. किंवा तुमचे कोणतेही डिटेल्स त्यांना सांगू नका.