हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अवकाळी पाऊस, बाजारभाव, कर्जमाफी अशा कित्येक अडचणींमुळे राज्यांतील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे या शेतकर्यांना आर्थिक बळ देण्यासाठी मोदी सरकारने एक महत्त्वाची योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 30 हजार रुपये पेन्शन मिळत आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री किसान मानधन योजना (Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana) आहे. आज आपण याचं योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.
योजनेसाठी कोणाला अर्ज करता येणार?
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत तुम्ही ज्या वयामध्ये गुंतवणूक करतात त्यावरून तुमची रक्कम ठरवली जाईल. गुंतवणुकीची रक्कम साधारण 55 ते 200 रुपयांपर्यंत सरकारकडून निश्चित करण्यात आली आहे. जरी एखाद्या शेतकऱ्याने अठराव्या वर्षी योजनेसाठी अर्ज केला तर त्याला 55 रूपये दरमहा गुंतवणूक करावी लागेल. तसेच, तो 60 वर्षांचा झाल्यानंतर त्याला दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळेल.
लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास?
या योजनेचा फायदा घेत असताना किंवा गुंतवणूक करत असताना लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत त्याच्या पत्नीला किंवा मुलाला दरमहा 50 टक्के पेन्शन मिळत राहील. म्हणजेच, शेतकरी पतीच्या पत्नीस दरमहा पंधराशे रुपये पेन्शन दिली जाईल. मुख्य म्हणजे, या योजनेचा लाभ केवळ 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना घेता येऊ शकतो.