मोदी सरकारचा ग्रामीण भागाला मोठा दिलासा ! महाराष्ट्राला 861 कोटींचा निधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब बनली आहे. केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागाला देखील कोरोनाने विळखा घातला आहे. अशा परिस्थितीत देशातील ग्रामीण भागासाठी मोदी सरकारने दिलासादायक बातमी दिली आहे. मोदी सरकारने ग्रामीण भागातील जनतेला मोठी रसद पाठवली आहे. मोदी सरकारने 25 राज्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांना तब्बल आठ हजार नऊशे ते वीस कोटी रुपयांची मदत देऊ केली आहेत. यापैकी 861 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राच्या वाट्याला आला आहे. तर उत्तर प्रदेशात सर्वाधिक 1441कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.

या कारणासाठी वापरला जाणार निधी

हा निधी सोसायटी, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना देण्यात येतील. करोनाशी लढण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणं विकत घेण्यासाठी आणि सुविधा सुदृढ करण्यासाठी हा पैसा वापरता येईल त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरूनही दिली आहे. याबाबत बोलताना त्यांनी म्हंटले आहे की ,”सरकारने कोरोनाशी लढण्यासाठी ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना ८९२४ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले असून यातील ८६१ कोटी रुपये महाराष्ट्राला देण्यात आले आहेत.राज्यातील ग्राम पंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा १५व्या आर्थिक आयोगाच्या शिफारशीनुसार ते कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे विकत घेण्यासाठी आणि सुविधा सुदृढ करण्यासाठी वापरू शकतात.महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनाशी लढण्यासाठी महाराष्ट्राचे वित्त मंत्री आणि ग्राम विकास मंत्री ही रक्कम लवकरात लवकर ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हाती सोपवतील अशी आशा! असे ट्विट पाटील यांनी केले आहे.

 

महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी

महाराष्ट्राच्या कोरोना लढ्याला यश येत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण आज राज्यात नव्या कोरोना रुग्णांमध्ये घट झाली आहे. तर कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ४८ हजार ४०१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. पण दिलासादायक बाब म्हणजे राज्यात रविवारी तब्बल ६० हजार २२६ रुग्णांनी कोरोनावर मात केली.यात मुंबईनं लक्षवेधी कामगिरी केल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण आता ९१ टक्क्यांवर पोहोचलं आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी होताना दिसत आहे. राज्यात आतापर्यंत ४४ लाख ७ हजार ८१८ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. राज्यात रविवारी ५७२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के इतका आहे.

सध्या राज्यात ३६,९६,८९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,९३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात रविवारी एकूण ६ लाख १५ हजार ७८३ सक्रीय रुग्ण आहेत.

Leave a Comment