नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या फसवणुकीचे अनेक गुन्हे देशभरात दाखल झाले आहेत. ग्राहक मंचामार्फत अनेक प्रश्न सोडवले जात आहेत परंतु त्याला ,म्हणावे इतके यश येत नाही. तसेच आटा ग्राहकांच्या हितासाठी मोदी सरकार नवीन कायदा बनवण्याच्या तयारीत आहे.
ग्राहक सरंक्षण कायदा २०१९ हा कायदा २० जुलै पासून लागू करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. हा नवीन कायदा बनवला गेला आहे त्या कायद्यामध्ये १९८६ च्या सर्व तरतुदींचा समावेश केलेला आहे.
नवीन कायद्याबद्धलची माहिती हि केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी दिली. येत्या २०जुलै ला ग्राहक संरक्षण कायद्याची अंबलबजावणी होण्यास सुरुवात होणार आहे. नवीन कायदा सुरु होताच जुन्या कायद्यामध्ये ग्राहकांच्या हिताच्या ज्या गोष्टींचा समावेश नव्हता त्या नवीन कायद्यामध्ये लागू होणार आहेत.
ग्राहक संरक्षण कायदा २०१९ हा खूप दिवसांपूर्वी पासून तयार होता. परंतु कोरोनाच्या संकटामुळे कायदा लागू करणे शक्य झाले नाही. हा कायदा काही महिन्यांपूर्वी लागू होणार होता . परंतु २०जुलै पासून त्याची देशभरात अंबलबजावणी सुरु होईल.
ग्राहक संरक्षण कायदा २०१९ मधील काही ठळक मुद्धे –
१. नवीन कायद्याअंतर्गत ग्राहकांना दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई केली जाणार.
२. ग्राहक देशातील कोणत्याही ग्राहक मंचाकडे तक्रार करू शकतात.
३. ऑनलाईन टेलीशॉपिंग कंपन्यांचा पहिल्यादाच समावेश करण्यात आला आहे.
४. खाण्या – पिण्यातल्या वस्तूंमध्ये भेसळ केल्यास दंड व तुरुंगवासाची कारवाई केली जाणार.
५. याचिका आता ग्राहक मंचाकडे सुद्धा दाखल करता येणार आहे.
६. ग्राहक मंचाकडे १ कोटी तक्रारी दाखल केल्या जाणार .
७. राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगात १० कोटींपेक्षा जास्त प्रकरणाची सुनावणी केली जाणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.