फडणवीसांच्या मी पुन्हा येईन..घोषणेत घमेंड, गर्व नाही तर.. – नारायण राणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. सामनात छापून आलेल्या या मुलाखतीत शरद पवार यांनी भाजपा व देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख न करता टीका केली होती. विशेषतः फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या विधानावरही पवार यांनी भाष्य केलं होतं. यावर भाजपाचे नेते आणि खासदार नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ”मी पुन्हा येईन. यात घमेंड गर्व नाही, तर हे आपल्या कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी वाक्य आहे. मी ५ वर्षे यशस्वी काम केलं. त्यामुळे लोक मला निवडून देणार, तो विश्वास देवेंद्र फडणवीसांनी त्यातून व्यक्त केला. मग शरद पवार यांना असं का दिसावं? असा सवाल उपस्थितीत करत राणेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्यावर तोफ डागली आहे.

सामनातील शरद पवार यांच्या मुलाखतीचा समाचार घेताना नारायण राणे पुढे म्हणाले कि, “मुलाखतीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली. सत्तेचा दर्प चालत नाही, लोक पराभूत करतात, हे कोणाला उद्देशून होतं. नाव का नाही घेतं. पण हे देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून आहे. फडणवीस हे घमेंड करणारे, गर्व करणारे व्यक्ती नाहीत. सत्तेवर असताना त्यांनी मुख्यमंत्री पदाची मस्ती आली, असं एकही उदाहरण कुणी सांगू शकत नाही असं दावा नारायण राणेंनी येवेळी केला.

“सगळ्यांना माहिती आहे, कोरोनामुळे देशात व जगात हाहाकार झाला आहे. महाराष्ट्रात भयावह परिस्थिती आहे. करोनावर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात. याविषयी मुलाखतीत मार्गदर्शक केलं असतं, तर मी समजलं असतो की ही भीमटोला मुलाखत यशस्वी झाली. शरद पवारांवर जितकी टीका सामनातून झाली, तितकी कोणत्याही वर्तमानपत्रातून झाली नाही. शरद पवारांविषयी मला आदर आहे, पण सामनातील ही मुलाखत हेच राजकारण आहे,” अशी टीकाही राणे यांनी यावेळी केली.

”१०५ आमदारांमध्ये शिवसेनेचं योगदान काय. २०१४ मध्ये शिवसेनेचे खासदार, आमदारा निवडून आले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे. २०१९ मध्येही मोदी आणि भाजपामुळे शिवसेनेचे खासदार-आमदार निवडून आले. हे तिघे एकत्र आले, यांचं आश्चर्य आहे. काही नेत्यांच्या तोंडून मी ऐकलं होतं की, शिवसेना जातीयवादी पक्ष आहे. मग आता एकत्र कशामुळे आले. ते जनतेला समजून सांगितलं असतं, तर बरं झालं असतं,” असा टोलाही राणे यांनी शिवसेनेला यावेळी लगावला.

Leave a Comment