मोदींनी रॅलीच्या स्टेजवरून उतरून लोकांचे प्रश्न सोडवण्याची गरज… : प्रियांका गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था :देशात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. अशा परिस्थितीत ‘केंद्र सरकारातील नेत्यांनी रॅली आणि प्रचार मध्ये लक्ष देण्यापेक्षा लोकांच्या जिवाची पर्वा करावी’, असे मत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी वृत्तसंस्थेशी दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

लसीकरणात भारतीयांना प्राधान्य का नाही

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, की, “गेल्या १ महिन्यांत १.१ दशलक्ष रेमडीसीव्हर इंजेक्शन निर्यात करण्यात आले. आज आम्हाला आपल्या देशाला रेमडिसिवीरची कमतरता आहे. सरकारने 6 कोटी लस निर्यात केली. जानेवारी-मार्चमध्ये लसीकरण करण्यात आले. भारतीयांना प्राधान्य का दिले नाही? ” असा सवाल त्यांनी उपस्थिती केला.

रॅलीच्या स्टेजवरून उतरा…
यावेळी पुढे बोलताना प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारच्या प्रचार आणि रॅली बाबत टीका केली त्या म्हणाल्या ‘पंतप्रधानांनी हसत आणि विनोद करणाऱ्या रॅलीच्या स्टेजवरुन उतरण्याची गरज आहे. त्यांना इथे येण्याची गरज आहे, लोकांसमोर बसण्याची गरज आहे. त्यांनी लोकांशी बोलले पाहिजे बोला आणि सांगा की जीव कसा वाचवणार आहे? असा सवाल करीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.”

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की “मनमोहनसिंग दहा वर्षासाठी पंतप्रधान होते. जर राष्ट्र महामारीचा सामना करत असेल तर त्यांनी सल्ला दिला असल्यास ते ज्या सन्मानचे होते त्या सन्मानानेच त्यांच्या सूचना घ्याव्यात. असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

सरकार ISI शी बोलू शकते पण विरोधी नेत्यांशी नाही

हे सरकार ISIशी बोलू शकते. ते दुबईत आयएसआयशी बोलत आहेत. ते विरोधी नेत्यांशी बोलू शकत नाहीत का? मला असं वाटत की विरोधी पक्षनेते देखील त्यांना मदत करायला तयार आहेत. पण मोदींना ते योग्य वाटत नाही असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

Leave a Comment