हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनाची महाभयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात राजकीय नेते मात्र एकमेकांवर टीका करत आहेत. कोविशील्ड लसीवरून राज्य तसेच देशपातळीवर राजकारण केलं जात आहे. काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लसीवरून केल्या जात असलेल्या राजकारणाबाबत टीका केली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. केवळ खोटे उत्सव, पोकळ भाषण नको, उपाययोजनाही करा, अशा सल्ला राहुल गांधी यांनी त्यांना दिला आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या होम क्वारंटाइन असून, त्यांनी पंतप्रधान मोदी सरकारकडून घेतल्या जात असलेल्या निर्णयावर लक्ष ठेऊन आहेत. राहुल गांधी यांनी ट्विटरवरून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.
घर पर क्वॉरंटीन हूँ और लगातार दुखद समाचार आ रहे हैं।
भारत में संकट सिर्फ़ कोरोना नहीं, केंद्र सरकार की जन विरोधी नीतियाँ हैं।
झूठे उत्सव व खोखले भाषण नहीं, देश को समाधान दो!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 22, 2021
होम क्वारंटाइन असतानाही राहुल गान्धी यांनी ट्विट करून मोदी सरकारवर टीका केली आहे. गांधी यांनी आपलय ट्विट मध्ये म्हणत आहे कि, मी घरी विलगीकरणात आहे आणि सतत वाईट बातम्या येत आहेत. भारतात संकट केवळ कोरोनाचे नाही, केंद्र सरकारचे धोरण जनतेविरोधातील आहे. खोटे उत्सव व पोकळ भाषण नाही, देशाला तोडगा द्या, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.