सकाळी ICU मध्ये तर रात्री मैदानात; मोहम्मद रिझवानच्या देशप्रेमाचं होतंय कौतुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टी20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला असला तरी आक्रमक सलामीवीर मोहम्मद रिझवानच्या देशप्रेमाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. उपांत्य सामन्यापूर्वी आयसीयूमध्ये उपचार घेणारा रिझवान संघाला गरज असताना अगदी मोक्याच्या क्षणी देशासाठी मैदानात उतरला. तो फक्त मैदानात उतरलाच नाही तर धावांचा पाऊस पाडला.

आठवड्यात रिझवानला चेस्ट इन्फेक्शन म्हणजेच फुफ्फुसांचा संसर्ग झाला होता. मंगळवारी रिझवान आजारी पडल्यानंतर तो दोन दिवस दुबईमधील एका रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत होता अशी माहिती समोर आली आहे. त्याने फार वेगाने स्वत:ला सावरलं आणि सामन्याआधीच्या चाचण्यांमध्ये तो खेळण्यासाठी पात्र ठरला.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया विरुद्ध च्या सामन्यात मोहम्मद रिझवान ने पुन्हा एकदा पाकिस्तान ला आक्रमक सुरुवात करून दिली होती. ऑस्ट्रेलियाविरोधातील उपांत्य सामन्यात रिझवान यांनं 52 चेंडूत 67 धावांची खेळी केली. देशाप्रति असलेलं प्रेम रिझवानला मैदानात घेऊनं आल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियातून येत आहेत