नवाब मलिकांचेच अंडरवर्ल्डशी संबंध, त्यांना उपचाराची गरज; हाजी अराफत शेख यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। ईडीच्या वतीने वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची चौकशी केली जात असल्याने यावरून भाजप नेते तथा अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे. नवाब मलिक जे आरोप करीत आहेत. त्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करून चांगले उपचार करण्याची वेळ आली आहे. त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असून त्याबाबत पुरावेही सादर करणार आहे, असे शेख म्हणाले.

भाजप नेते हाजी अराफत शेख यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मलिक यांच्या विरोधात आपण लवकरच पुरावे सादर करणार आहोत. मलिक यांनी आतापर्यंत अनेक घोटाळे केलेले आहेत. मलिक या भ्रष्ठाचारी मंत्र्याने मुस्लिमांच्या जमिनीवर कब्जा करून हात मारण्याचे काम केले आहे. नवाब मलिक यांनी फिल्म सुरू केली आहे, पण आम्ही ती पूर्ण करणार आहोत. मलिक यांचे मानसिक संतुलन बिघडले असून, त्यांना तातडीने मानसिक उपचारांची गरज आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाजी अराफत यांच्या भावाला वाचवण्यासाठी आणि बनावट नोटांच्या रॅकेटला संरक्षण देण्याचे काम केले असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांच्या आरोपानंतर भाजप नेते हाजी अराफत शेख यांनीही आज पत्रकार परिषद घेत मलिक यांच्यावर टीका केली आहे.

You might also like